चांगी विमानतळ, सिंगापूरबगीचे, पोहण्याचा तलाव आणि विक्री दुकाने या व्यतीरिक्त या ठिकाणी प्रवाशांना अनोखा अनुभव येतो, तो म्हणजे नैसर्गिक माग आणि फुलपाखरांचे बगीचे. तुम्ही जर काही वेगळे अनुभवू इच्छिता, तर टर्मिनल ३ येथे कॉर्कस्क्रू राईड करता येते, जी चार मजली आहे. नक्कीच जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक आहे.दुबई आंतरराष्टÑीय विमानतळमॉल, पंचतारांकित हॉटेल, स्पा आणि झेन गार्डनही या विमानतळावर आहे.हाँगकाँग आंतरराष्टÑीय विमानतळया ठिकाणी विमानचालन संशोधन केंद्र, गोल्फ कोर्स, चहा तयार करण्याची पद्धत, शैक्षणिक पार्क, कला आणि संस्कृतीचे दालन आहे. या ठिकाणी युए आयमॅक्स ३ डी थिएटरही आहे.इंचेओन आंतरराष्टÑीय विमानतळ, दक्षिण कोरियाजगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक. या ठिकाणी स्केटींग रिंक आहे, ज्याला आईस फॉरेस्ट असे म्हटले जाते. जॅझ आणि बी-बॉय सारख्या मनोरंजनाच्या सोयी देखील उपलब्ध आहेत. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि दागिन्यांचे बगीचेदेखील आहेत.मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळखास सुविधा जरी नसल्या तरी तुमच्या डोळ्याला मनोहारी वाटेल असे बरेच काही या विमानतळावर आहे. सांस्कृतिक परिसरात तुम्हाला भारतामधील अतुल्य गोष्टींची माहिती मिळू शकते.म्युनिच विमानतळ, जर्मनीतुम्हाला या ठिकाणी मद्यालय, गोल्फ कोर्स, बिअर हॉल, टर्मिनल दरम्यान लाईव्ह बँड आणि म्युनिच विमानतळावर संग्रहालय देखील पहावयास मिळेल.सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्टÑीय विमानतळ, कॅलिफोर्नियातुमच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर तुम्ही या विमानतळावर योगा रुमध्ये जाऊन काही वेळ ध्यान करु शकता.शिपॉल आंतरराष्टÑीय विमानतळ, अॅम्स्टरडॅमया विमानतळावर तुम्ही अॅमस्टरडॅम शहर पाहू शकता. कॅसिनो आणि ध्यान केंद्रही आहे.