रेल्वे स्टेशनवर अख्खा दिवस थांबणे हे बºयाच जणांना नक्कीच आवडणार नाही. प्रचंड गोंगाट आणि गोंधळ यामुळे काहींना तर क्षणभरही रेंगाळणे अशक्य होते. तथापि, काही रेल्वे स्थानके आश्चर्यकारक असतात. वास्तूशास्त्रानुसार तयार करण्यात आलेल्या इमारती, ऐतिहासिक महत्त्व यामुळे रेल्वे स्थानक हे देखील पाहण्याजोगे असते. जगभरातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकांची ही माहिती....ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॉर्करीड आणि स्टेम व वॉरेन आणि वेटमोर या वास्तूरचनाकारांनी या इमारतीचा ढाचा तयार केला. न्यूयॉर्कचे रेल्वे स्थानक हे प्रवाशांसाठी जगातील सर्वोत्तम रेल्वे स्थानक मानले जाते. या स्थानकाला दरवर्षी दोन कोटी प्रवाशी भेट देतात. या ठिकाणी 44 प्लॅटफॉर्म्स आणि 67 ट्रॅक आहेत. 1913 साली या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात आले होते. एकेकाळी कला दालने आणि संग्रहालये म्हणून याचा वापर केला जात होता. हे स्थानक नेहमीच अव्वल स्थानी आहे. द गॉडफादर आणि मेन इन ब्लॅक या चित्रपटाचे चित्रीकरणही याच ठिकाणी झाले.छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबईयुनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश असलेले एकमेव रेल्वे स्थानक. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे वास्तूकलेचे उत्तम उदाहरण आहे. फ्रेड्रीक विल्यस स्टीव्हन्स यांनी मुगल आणि व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीने याची निर्मिती केली. 1888 साली हे खुले करण्यात आले. यापूर्वी याला व्हिक्टोरिया टर्मिनस असे ओळखले जायचे. नंतर याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. दररोज तीन लाख लोक या स्थानकाचा वापर करतात.सेंट पॅन्क्राज इंटरनॅशनल, लंडन‘रेल्वेचे कॅथड्रील’ अशी याची ओळख आहे. सेंट पॅन्क्राज हे 1868 साली खुले करण्यात आले. जुन्या इमारतीचे अनेक वेळा पुनर्निर्माण करण्यात आले. ही विख्यात व्हिक्टोरियन वास्तूरचना आहे. यात अनेक कलाकृती आहेत. त्या काळात सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जायचे. या स्थानकात दुकाने, रेस्टॉरंट आहेत.अॅटोचा स्टेशन, माद्रिद1851 साली खुले करण्यात आलेल्या या स्थानकाला अवर लेडी आॅफ अॅटोचा यांचे नाव देण्यात आले. अल्बर्टो डी पॅलासिओ एलिसांज आणि गुस्ताव्ह आयफेल यांनी याची रचना केली. या स्थानकात मोठे बगीचे, छोटेसे जंगल आहे. स्पॅनिच रचनाकार राफेल मोनिओ यांनी याची रचना केली आहे. यात अनेक झाडे आणि दुर्मिळ प्राणी आहेत. 2004 च्या माद्रिद बॉम्बहल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या स्मृती या स्थानकात जपण्यात आल्या आहेत.अँटवर्प सेंट्रल, अँडवर्पजगभरातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकापैकी एक. 1905 साली हे खुले करण्यात आले. लुईस डेलसिन्सिअरी यांनी याची निर्मिती केली. या ठिकाणी प्रवाशांच्या प्रतिक्षागृहावर मोठा घुमट आहे. ट्रेनशेडची रचना क्लिमेंट वॅन बोगार्ट यांनी केली आहे. बेल्जियन रचना हे याचे वैशिष्ट्य आहे. जगातील सर्वाेत्तम रेल्वेस्थाकांत याचा पाचवा क्रमांक आहे. अपवर्डचे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.