मनीषा कोईराला (अंडाशयाचा कर्करोग)सर्वकाही छान सुरु असताना एकेदिवशी मनीषाच्या आयुष्यात चढउताराचे अनुभव आले. तिला कर्करोग असल्याचे जेव्हा कळाले, तेव्हा ती उपचारासाठी अमेरिकेस गेली. अत्यंत संघर्ष केल्यानंतर तिने कर्करोगावर मात केली. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिच्या चेहºयावर हास्य होते. कर्करोग तुमच्या शरीराला इजा करु शकतो. परंतु, तुमच्या जिद्दीला नाही.युवराज सिंग (फुफ्फुस आणि हृदय यांच्यादरम्यान झालेली गाठ)भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराजला कर्करोग (सेमिनोमा) झाल्याचे आढळून आल्यानंतर सारे क्रिकेटविश्व हादरले. युवराज उपचारासाठी अमेरिकेला गेला. त्या ठिकाणाहून त्याने फेसबुकवर अपडेट करीत आपल्या फॅन्सना दिलासा दिला. तो परतला तो विजयी होऊनच. त्याने यावर पुस्तकही लिहिलेय, ‘द टेस्ट आॅफ माय लाईफ’लिसा रे (रक्ताचा कर्करोग)कर्करोगाशी लढा दिल्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये लिसा रे हिने आपण कॅन्सरसोबत जगत असल्याचे मान्य केले. ‘मला रक्ताचा कर्करोग झाला आहे, हा आजार बरा होण्यासारखा नाही आणि मी अशाही स्थितीत राहते आहे, असे तिने म्हटले. तिच्या जगण्याच्या जिद्दीला नक्कीच सलाम करण्यासारखे आहे.अनुराग बासू (रक्ताचा कर्करोग)लाईफ इन मेट्रो आणि बर्फी अशा उत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा अनुराग बासू हा कर्करोगाशी झगडतोय, हे किती लोकांना माहिती आहे? डॉक्टरांनी त्याला केवळ २ महिने जगशील असे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने ‘लाईफ इन मेट्रो’ आणि ‘गँगस्टर’ची स्क्रीप्ट लिहून काढली. त्याच्या धाडसाला मानलेच पाहिजे.हग जॅकमन (त्वचेचा कर्करोग)२०१३ साली हग जॅकमॅनच्या नाकाच्या पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग आढळून आला. त्यानंतर त्याने अनेक उपचार घेतले. प्रत्येक तीन महिन्याला तो तपासून घेतो. स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच त्याने त्वचेच्या कर्करोगाबाबत सार्वजनिक काळजी घेण्यासाठी चळवळही सुरु केली आहे.मुमताज (स्तनाचा कर्करोग)वयाच्या ५४ व्या वर्षी, एकेकाळची सुंदर अभिनेत्री मुमताज हिला कर्करोग झाल्याचे समजले. तिने न घाबरता कर्करोगाशी लढा देण्याचे ठरविले. शस्त्रक्रियेच्या अत्यंत भयानक अनुभवानंतर आयुष्याशी नवा डाव खेळण्याचे तिने ठरविले. वजन वाढविणे, लठ्ठपणा आणि इतर आजारांशीही तिने लढा दिला. अजूनही तिचा चेहरा तितकाच आकर्षक आणि उत्साही आहे, जितका सध्या पैशाच्या मागे धावणाºया अभिनेत्रींचा आहे. दररोजचा व्यायाम, पोहणे आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे शक्य झाले आहे. २०१० साली मुमताजने ‘१ अ मिनिट’ या नावाने वृत्तपटही काढला.