केसांना मेहंदी लावण्याआधी या ५ गोष्टी नक्की वाचा. By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 5:25 PM
1 / 5 मेहंदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा वापर सौदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्यातील उपयुक्त घटकांमुळे केसांविषयक औषधे किंवा तत्सम वस्तुंमध्ये मेहंदीचा मोठा वापर केलेला आढळतो. 2 / 5 मात्र केसांना किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर मेहंदी लावण्याआधी या काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते आपल्याला महाग पडण्याची दाट शक्यता अाहे. कारण त्यातील काही गुणधर्म आपल्याला अपायकारक ठरु शकतात. 3 / 5 मेहंदी बनवताना काही चुकीची पध्दत वापरली गेली तर त्याचे मुळ नैसर्गिक गुणधर्म बदलतात. अशी मेहंदी केसांना लावल्याल केस शुष्क आणि राठ होतात. त्यातील ओलावा निघून जावून ते निर्जीव दिसतात. त्यामुळे मेहंदीनंतर केस धुवून, सुकवून, तेल लावून काही तासांनी पुन्हा धुवावेत. 4 / 5 मेहंदी लावताना डोळ्यात गेल्यास त्वरीत थंड पाण्याने डोळे धुवावेत. कोणत्याही प्रकारे मेहंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे चुरचुरायला लागतात आणि लालभडक होतात. जास्त त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. 5 / 5 चांगल्या प्रतीची मेहंदी योग्य प्रमाणात योग्य वेळेसाठी भिजत ठेऊन लावल्यास ते सर्वोत्तम रिझल्टस् देते. योग्य मेहंदीच्या नियमित वापराने केसांना चमक, दाटपणा आणि वाढ प्राप्त होते. आणखी वाचा