dressing tips for working women during monsoon
पावसाळ्यात फॅशन करायचीय? मग हे नक्की लक्षात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:40 PM1 / 9पावसात बेभान होऊन भिजणं सगळ्यांनाच आवडतं मात्र कामानिमित्त बाहेर पडायचं असेल आणि नेमका पाऊस आला की सगळ्यांचाच मूड ऑफ होतो. पावसाळ्यात कपड्यांसोबतच केस आणि मेकअप खराब होतो पण मग अशावेळी मान्सून फॅशनचे काही फंडे वापरून कसं सुंदर दिसायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 9पावसाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शक्यतो टाळा. कारण ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच पावसात त्यावर एखादा डाग पडल्यास तो पटकन जात नाही.3 / 9पावसाचा जोर जास्त असला की, आपली बॅग ही भिजते. बॅगेतील सामान ओलं होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ बॅग वापरा.4 / 9पावसाळ्यात पावसाळी चपला वापरा. चामड्याच्या चपला टाळा. कारण त्या लवकर कोरड्या नाहीत.5 / 9लॉन्ग स्किर्ट आणि लॉन्ग ट्राऊजर्स वापरू नका कारण हे पाण्यात भिजवून खालच्या बाजूने खराब होतात.6 / 9पावसाळ्यात लाइट मेकअप असावा. वॉटरप्रूफ लायनर आणि काजळ वापरा.7 / 9पावसात केस मोकळे सोडू नका कारण ते ओले होऊन खराब होण्याची शक्यता असते.8 / 9पावसाळ्यात डेनिमचे कपडे वापरू नका कारण ते लवकर वाळत नाहीत. त्यामुळे शिफॉन किंवा जॉर्जेटसारखे कापड वापरा.9 / 9पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे छत्री. बाजारात आकर्षक रंगीबेरंगी छटा असलेल्या सुंदर फ्रिलवाल्या छत्र्या उपलब्ध आहेत त्याचा वापर करा. आणखी वाचा Subscribe to Notifications