बऱ्याच चित्रपटांमध्ये नायकांनी आपल्या शरीराच्या विविध भागांवर टॅटू बनविलेले आपण पाहतो. त्यांचेच अनुकरुन म्हणून सध्याच्या तरुणाईत टॅटूची क्रेझ वाढलेली दिसत आहे. टॅटू बनविताना वेदना होऊनही फक्त फॅशन ट्रेंड सुरु आहे म्हणून बरेच तरुण मोठ्या हिंमतीने शरीरावर टॅटू बनवितात. मात्र काहीजण सुई टोचण्याच्या भीतीमुळे इच्छा असतानाही टॅटू बनवित नाहीत. मुले थोडी फार हिंमत करुन टॅटू बनवितात. विशेषत: मुली तर जास्त घाबरतात. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, मनात खूप इच्छा असूनही फक्त सुई टोचण्याच्या भीतीने मुलींचे टॅटू बनविण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही.* पोट पोटावर टॅटू कोरल्यास वेदना कमी होतात. विशेष म्हणजे पोटावरील टॅटू दिसायला फार आकर्षक दिसतो. विशेषत: नाभीजवळ कोरलेला टॅटू हटके दिसते. * खांद्याचा बाहेरील भाग खांदा व काखेच्या मधोमध हाताकडे निमुळता होणाऱ्या भागावर टॅटू केल्याने वेदना फार कमी जाणवते. * मानेच्या मागील भागबॅक टॅटूप्रमाणे मानेच्या मागील भागात कोरलेला टॅटू दिसायला आकर्षक दिसतो. * मांडी मुलींच्या मांडीवर बहुधा टॅटू कोरलेला असतो. या जागी फार दुखत नसल्यामुळे मुली इथे टॅटू कोरणे पसंत करतात. हा टॅटू दिसायलाही छान दिसतो.* मनगट नाजूक डिझाईनचा टॅटू मनगटावर कोरल्यास हातही सुंदर दिसेल व जास्त दुखणारही नाही.