प्रियांका लोंढे ये रेशमी जुल्फे.... असे म्हणण्याचा जमाना आता गेला आहे. सध्या बदलत्या फॅशनच्या दुनियेत चलती आहे ती कर्ली हेअरची. कोणत्याही आऊटफिटवर मस्तपैकी कर्ल्स करुन ट्रेंडी लुक करण्याची अनोखी फॅशन सध्या पहायला मिळत आहे. वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल कपड्यांवरही बाऊंसी कर्ली हेअर एकदमच कुल दिसतात. सिनेमांमधील कर्ली हेअरची फॅशन आता चांगलीच पॉप्युलर होत असुन स्ट्रेट केसांचे कर्ल पार्लर मध्ये जाऊन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. माधुरी दिक्षितच्या कर्ली केसांच्या स्टाईलवर तेव्हा बरेच जण फिदा झाले होते. तर कंगणा राणावतच्या कर्ली हेअर वर खुप गॉसिपिंग देखील झाले. पण काही असले तरी सध्या बॉलीवुडमध्ये सुद्धा या कर्ली हेअरची फॅशन दिसु लागली आहे अन कॉलेज गोईंग तरुणींच्या सिल्की केसांचे आता कर्ल्स होऊ लागले आहेत. तुम्हालाही जर कर्ली हेअर करायचे अतील तर त्यासाठी काही खास टिप्स.... ओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कर्ल्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील. पिन कर्ल : केसांना चार भागात वाटून घ्या आणि क्वाइलसह ट्विस्ट करत रोल करा. नंतर ड्रायर वापरा. अता क्वाइल खोलून घ्या आणि कर्ली हेअर्स लुक मिळवा. कर्लिंग आयरन : कर्लिंग आयरनने आपण कोणाचीही मदत न घेता केस कर्ल करू शकतो. यात केसांना सम भागात वाटून घ्या. नंतर आयरन गरम करून केस कर्ल करा. पण याचा अती वापर केसांची क्वालिटी खराब करू शकते हॉट रोलर्स : केस लवकर कर्ली करायचे असतील आणि वेळ कमी असेल तर हॉट रोलर्स वापरा. याने रोल करून बोटाने केस हलके मोकळे करून घ्या. डिफ्यूझर वापरा: जर आपण केसांना हिट वेव्सने कर्ल करत असाल तर डिफ्यूझर वापरा. याने आपले केस ड्राय दिसणार नाही. वेणी : अनेक लोकांना हिट वेव्स किंवा हॉट रोलर्स वापरणे योग्य वाटतं नाही. त्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी रात्री केसांना तेल न लावता अनेक वेण्या बनवा. सकाळी या वेण्या खोलून घ्या. केस कर्ली दिसतील. हा उपाय लॉग हेअर्ससाठी उत्तम आहे. उलटी वेणी : खांद्यापर्यंत केस असणाºयांसाठी हाही एक सोपा उपाय आहे. रात्री तेल न लावता उंच पोनीटेल बांधा. मग खालील बाजूपासून विपरित दिशेत केस गुंडाळत वरपर्यंत न्या आणि मोठे क्लचर लावून घ्या. सकाळी उठल्यावर नॅचरल कर्ल्स दिसतील.