आपली चप्पल, बुट, सँडल आता केवळ पायाला इजा होऊ नये म्हणून वापरायच्या वस्तू राहिलेल्या नाहीत. पादत्राणे आता स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन बनले आहेत. त्यामुळेच दर वर्षी फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते.चप्पल बुटांमध्ये सतत काही तरी नवीन येणार तरी काय असे जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला रायन व अॅडम गोल्डस्टोन या जुळ्या भावंडांविषयी जाणून घेतलेच पाहिजे.२०१० साली या दोघांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘अॅथेलिटिक प्रॉप्युलजन लॅब्स’ ही शूज बनविणारी कंपनी स्थापन केली होती. फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू गोल्डस्टोन बंधूंनी शूजमध्ये नवीन तंत्रज्ञान कसे वापरू शकतो याचा ध्यास घेतला होता.मोठमोठ्या बॅ्रंड्सकडे असणाºया अॅडव्हान्स्ड प्रयोगशाळा, भांडवल आणि मनुष्यबळ त्यांच्याकडे नव्हते. परंतु तरीही त्यांनी जिद्दीने ‘लोड-एन-लाँच’ टेक्नोलॉजीयुक्त असे‘ कॉन्सेप्ट १’ हे शूज बाजारात आणले.बास्केटबॉल खेळाडू अधिक उंच उडी मारण्यासाठी ते वापरू लागले. ते इतके प्रभावी होते की, एनबीएने ते बास्केटबॉल खेळाडूंना ते वापरण्यास बंदी घातली. त्यामुळे तर ‘कॉन्सेप्ट १’ची लोकप्रियता प्रचंड वाढली.नऊ महिन्यांच्या स्टॉकची केवळ तीन दिवसांत हातोहात विक्री झाली. लोकांचा मिळालेला हा रिस्पॉन्स गोल्डस्टोन बंधूसाठी प्रेरणादायी ठरला.आता पाच वर्षांनंतर त्यांनी ‘ब्लेड’ हे नवे बॉस्केटबॉल शूज बाजारात आणले आहेत. ‘कॉन्सेप्ट १’ची क्वालिटी आणि धोरण अवलंबून तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा वापर केलेले ‘ब्लेड’ हे अल्टिमेट अॅथेलिट स्पोट्स स्निकर्स आहेत.त्यामुळे येथून पुढे आता केवळ आपल्या शूजकडे केवळ पायात घालायची वस्तू म्हणून नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून बघा.