ट्री-हाऊस ही संकल्पना विदेशात फार प्रचलित आहे. लहान मुलांना तर सुट्यांमध्ये अशा ट्री-हाऊसमध्ये राहायला खूप आवडते.तुम्ही अनेक प्रकारचे ट्री-हाऊस पाहिले असतील, काही खूप भन्नाटही पाहिले असतील मात्र, ऐबेक अल्मासोव्ह या आर्किटेक्टने बांधलेल्या या ट्री-हाऊसची बातच न्यारी आहे.‘ट्री इन द हाऊस’ नावाचे हे घर म्हणजे एका झाडाभोवती दंडगोलाकार काचेची वास्तू आहे. तीन वर्षांपूर्वी 2013 साली त्याने हे घर बांधण्यास सुरुवात केली होती; परंतु गुंतवणूकदारांनी अंग काढून घेतल्यामुळे त्याचा हा प्रोजेक्ट थांबला होता.पण आता एका काच व सोलार पॅनेलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने पुढाकार घेतल्यामुळे अल्मासोव्हच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या घरामागची संकल्पना स्पष्ट करताना तो सांगतो, भविष्यात वृक्षतोड न करता कशा प्रकारे घर बांधले जाऊ शकते याचा प्रयत्न मी ‘ट्री इन द हाऊस’द्वारे करत आहे.घरातील चारही मजली चक्राकार पायऱ्यांनी जोडलेले आहेत. काच असल्यामुळे जंगलाचा एकदम नयनरम्य घरातून दिसतो व्ह्यूव दिसतो. किचन, बाथरूम, शॉवरसह ट्रेंडी फर्नीचरचीदेखील सुविधा या अद्भूत घरात आहेत. सर्व गोष्टी वेळेत घडून आल्या तर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला कझाकस्थान येथील अल्माटी येथे हे घर उभारण्यास प्रारंभ होईल. तोपर्यंत तुम्हीदेखील हे फोटोज पाहा...