How to buy right size of footwear online
Online Shopping दरम्यान असे खरेदी करा योग्य साइजचे फुटवेअर्स By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 4:21 PM1 / 6सध्या स्वतः जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. अनेक लोक कपडे, किचन अप्लाएन्सेस, भाज्या, औषधं, फुटवेअर्स यांसारख्या अनेक गोष्टी ऑनलाईन खरेदी करतात. यांपैकी कपडे आणि फुटवेअर्ससाठी त्यांना साइज सांगावी लागते. बऱ्याचदा कपड्यांची साइज त्यांना परफेक्ट येते. पण फुटवेअर मात्र अनेकद परत करावे लागतात. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, फुटवेअर्सच्या वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या साइजमध्ये तफावत आढळून येते. 2 / 6 जर तुम्हाला एखाद्या ब्रँडचा 5 नंबरचा शूज येत असेल तर असं होऊ शकतं की, दुसऱ्या एखाद्या ब्रँडचा तुम्हाला 6 नंबरचा शूज लागेल. शॉपवर फुटवेअर्स ट्राय करता येतात. परंतु, ऑनलाईन असं करणं शक्य नसतं. अशा परिस्थितीमध्ये काय करावं? असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेलचं. आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला ऑनलाईन परफेक्ट शूज निवडणं शक्य होईल. 3 / 6तुमच्या पायांची योग्य साइज मोजा. त्यासाठी तुम्हाला एका इंच टेपची गरज असेल. तसेच तुम्ही एका पेपरवर तुमच्या पायांची आउटलाइन काढून स्केलच्या मदतीने ती मोजू शकता. तुम्ही एखाद्या शॉपमध्ये फुटवेअर्स खरेदी करताना फुट साइज मोजण्याच्या टूलच्या मदतीने आपल्या पायांची साइज मोजू शकता. हा नंबर इंच किंवा सेंटिमीटर्समध्ये नोट करून ठेवा. ऑनलाईन शॉपिंग करताना या नंबर्सची मदत होईल. 4 / 6जर तुमचे पाय पुढिल बाजूने रूंद असतील तर नॅरो टोज शेप असणारे फुटवेअर्स खरेदी करू नका. 5 / 6अनेक लोकांच्या पायांची साइज पूर्ण नंबर्सची असत नाही. उदाहर्णार्थ, पायांची साइज 6 नसून साढे सहा असेल तर अनेकदा फुटवेअर्स खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही फुटवेअर्स ब्रँड्स असेही आहेत जे हाफ साइजमध्येही फुटवेअर्स उपलब्ध करतात. त्यामुळे छोटा किंवा मोठे फुटवेअर्स विकत घेण्याऐवजी हाफ साइज अवेलेबल असणाऱ्या फुटवेअर्सची निवड करा. 6 / 6जास्तीत जास्त ब्रँड्स आपल्या शूजवर यूएस, यूके, यूरोप आणि सेंटिमीटर्समध्ये साइज लिहितात. जर शॉपमध्ये ट्रायल घेत असताना तुम्हाला एखादा शूज परफेक्ट होत असेल तर त्याचा नंबर नोट करून घ्या. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगदरम्यान साइज चार्टमधून साइज सिलेक्ट करताना मदत मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications