-सारिका पूरकर-गुजराथीघरातील दरवाजे, खिडक्यांना पडदे लावायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सिल्क, कॉटन, नेट फेब्रिकचे आकर्षक रंगातील, विविध डिझाईन्सचे पडदे. मात्र पडद्यांची ही संकल्पना थोडी बदलून पाहण्याची वेळ आली आहे. कारण अॅक्रेलिक बीड्स, लाकडी बीड्स, बांबू बीड्स, प्लॅस्टिक बीड्स, हातानं विणलेले वायरीचे गोफ यांचे पडदे बाजारात उपलब्ध आहे. हे पडदे दिसायला तर सुंदर दिसतात शिवाय एक क्लासिक लूकही सजावटीला देतात. असंख्य डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या पडद्यांमुळे आपलं घर उठून दिसलं नाही तरच नवल! घर सजावटीसाठी बीडसचे पडदे कसे निवडाल?१) घराचा हॉल जर मोठा असेल तर सोफ्याच्या मागच्या बाजूला हे पडदे लावून तुम्हाला पार्टिशन करता येईल. सोफ्यामागे हे पडदे लावताना तुम्हाला भिंतीचा आधार नसेल तेव्हा छतावर रॉड टांगून त्यावर हे पडदे अरेंज करता येतात. यात सहसा सुती धाग्यांच्या (फक्त दोरीच्या स्वरूपातील लडी) पडद्यांचा वापर केला तर छान दिसतात. लाकडी बीड्स टे्रण्डी फील देतात. २) हॉलला जर सोफिस्टिकेटेड टच हवा असेल तर मेटल बीड्सचे पडदे लावावेत. कारण या बीड्सला छान चकाकी असते.या पडद्यांमुळे खोलीतील वातावरण देखील एकदम उत्साहपूर्ण राहतं.३) टेरेस विंडो किंवा फ्लोअर लेंथ विंडो असेल तसेच ज्याठिकाणी प्रायव्हसीची गरज नसेल अशा खिडक्यांवर क्रिस्टल बीड्सचे फॅन्सी पडदे लावून फ्रेश लूक मिळवता येतो. मात्र हे पडदे संपूर्ण खिडकीभर असायला हवेत.४) अॅल्युमिनियम चेनचे पडदेही आकर्षक रंगात, डिझाईन्समध्ये मिळतात. हे पडदे देखील तुम्ही पार्टिशन म्हणून वापरु शकता, किंवा ज्याठिकाणी सीटिंग अरेंजमेंट आहे त्यावर दोन्ही बाजूला कमानीच्या स्वरुपात हे पडदे लावता येतात.५) घरच्या घरी एखादी पार्टी करायची असेल तर भिंतीवरही सिल्कचे पडदे लावून त्यावर बीड्स कर्टन बॅकड्रॉप म्हणून लावून सजावट करता येते. दारांवरही कमानीच्या आकारात ते लावता येतात. ६) फ्लोअर लेंथ, शॉर्ट लेंथ अशा आकारात हे पडदे मिळतात. घरात कोणत्या ठिकाणी ते लावायचे आहेत, त्याप्रमाणे त्याची उंची ठरवावी. हे पडदे तुम्ही घरीही सहज बनवू शकता. बाजारात रेडिमेड क्रिस्टल बीड्स, पाईप्स मिळतात. ते नायलॉन दोऱ्यात ओवून सहज बीड्सचे पडदे बनवता येतात.७) बेडरुममध्ये बेडच्या मागील भिंतीवर बीड्सचे पडदे लावून हटके हेडबोर्ड तयार करता येतो. हा हेडबोर्ड दिसायलाही शाही लूक देतो.८) घरातील दरवाजांवर आणि कपाटांच्या दरवाजांवर बांबू बीड्सचे तसेच प्लॅस्टिक बीड्सचे पडदे लावण्याचा ट्रेण्डही लोकप्रिय होतोय. हा पर्याय कपाट सजविण्यासाठी बेस्टच आहे. एरवी डेकोरेशनच्या बाबतीत घरातील कपाटं थोडे दुर्लक्षितच असतात. नाही का! ९) बाबूूंच्याच बीड्स, पाईप्सला आकर्षक रंगात रंगवून त्यापासून तयार केलेले अॅबस्ट्रॅक्ट, फ्लोरल डिझाईन्समधील पडदेही घर सजावटीत खूप लोकप्रिय आहेत, त्याचाही वापर घराला हटके लूक देण्यासाठी करता येतो.