- मोहिनी घारपुरे-देशमुखअॅसिमेट्रिक ड्रेस या नावानेच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु अलिकडे फॅशन जगतात हे अॅसिमेट्रीक ड्रेसेस खूप लक्षवेधी ठरत आहेत. विशेषत: पार्टीजला जाताना हे अॅसिमेट्रिक ड्रेसेसच घालण्यास विशेष पसंती दिली जाते.अॅसिमेट्रिक ड्रेसच का?* हे ड्रेसेस अत्यंत क्लासिक दिसतात.* या ड्रेसची धाटणीच अशी असते की त्यामुळे लुकला एकदम उठाव येतो अणि तुम्ही वयापेक्षा तरूणच भासू लागता.* स्किनी जीन्स, लेगिंग्स यावर हे ड्रेसेस शोभून दिसतात. तसेच वयापरत्त्वे सुटलेलं पोटही हे ड्रेस आरामात झाकून टाकतात. त्यामुळेच हे ड्रेसस चाळीशीच्या घरातील महिलांनी तरूण दिसण्यासाठी आवडीनं घातले तर त्यात फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. प्रकार किती?अॅसिमेट्रीचे स्वत:च इतके प्रकार आहेत की त्याचा वापर करून बनवलेल्या ड्रेसेसमध्ये प्रचंड व्हरायटी आणि युनिकनेसही आढळतो. टॉप्स, कुर्तीज, ट्यूनिक्स, कोट्स, स्कर्ट्स अशा सर्वच प्रकारच्या कपड्यांमध्ये अॅसिमेट्री खूप चांगल्या पद्धतीनं इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. त्यामुळे नवनवीन प्रकारचे आणि त्याहूनही स्टायलिश कपडे वापरण्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो. अॅसिमेट्रिक अॅक्सेसरीजअॅसिमेट्रिक अॅक्सेसरीज हा देखील एक स्वतंत्र सेगमेण्ट फॅशनच्या दुनियेत लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे कानातले, गळ्यातले, अंगठी, बेल्ट, अँक्लेट्स या सर्व प्रकारांमध्ये अॅसिमेट्री वापरून तऱ्हेतऱ्हेची ज्वेलरी, अॅक्सेसरीज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या प्रकारचे कपडे आणि अॅक्सेसरीजच्या चाहत्यांचीही संख्या प्रचंड मोठी आहे. या कपड्यांचे विशेष म्हणजे एखादा असा कट या कपड्यांना दिलेला असतो की त्याने ड्रेस घालणाऱ्या व्यक्तीच्या सौंदर्यात भरच पडते. इंटरनेटवर सर्च केल्यास शेकडो प्रकारचे अॅसिमेट्रिक ड्रेसेस सापडतील तसेच तुम्हाला हवे असल्यास काही साईट्सवरून त्यांची खरेदीही करता येईल. विशेषत: वन शोल्डर ड्रेसेस, अॅसिमेट्रिक स्कर्ट्स यांची प्रचंड चलती आहे. एक्सेसरीजमध्येही अॅसिमेट्रिक कानातल्यांना प्रचंड मागणी आहे. पाश्चात्य देशांमध्ये, या अॅसिमेट्रिक ड्रेसेसच्या चाहत्यांचा एक वेगळा वर्ग असून तिथे हमखास या प्रकारच्या ड्रेसेसना प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.