अंबानींच्या राजकुमारीचा नववधू साज; दीपिका-अनुष्कापेक्षाही आहे खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:00 IST
1 / 6मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. 2 / 6ईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामल यांच्यासोबत 12 डिसेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधणार आहे. 3 / 6लग्नाआधी ईशा अंबानीसाठी गृह शांतीची पूजा करण्यात आली होती. यादरम्यानच्या ईशाच्या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 4 / 6ईशा अंबानीने पुजेसाठी केलेला हा खास लूक प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केला होता. ज्यामध्ये ईशा फार सुंदर दिसत आहे. 5 / 6सब्यासाचीने इंस्टाग्रामवर ईशा अंबानीचे काही फोटो शेअर केले आहेत. 6 / 6ईशा अंबानीचा हा लूक आणि तिच्या या फोटोंची चर्चा सध्या इंटरनेटवर होत आहे. सर्वांना ईशाचा हा लूक फार आवडला असून ईशाही या लूकमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे.