-Ravindra Moreप्रेमात किस अर्थात चुंबनाला खूपच महत्त्व असते. जेव्हा आपण कुणावर प्रेम करता तर जवळीकता साधण्यासाठी आणि आपल्या प्रेमाची जाणिव करण्यासाठी सर्वप्रथम चुंबनाने सुरुवात होते. तसे प्रेमात वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे चुंबन घेतले जाते. आजच्या सदरात कितीप्रकारचे किस आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहे याबाबत जाणून घेऊया. * कपाळावरील किस जेव्हा आपण कुणाच्या कपाळावर किस करतात तेव्हा त्याचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे आपण सध्या समोरच्याला मित्र समजता आणि दुसरे काही लोक कपाळावर किस करुन प्रेमाची सुरुवातही करतात. याशिवाय त्याची काळजी आहे हे दाखविण्यासाठीही कपाळावर किस केली जाते. * एसमिको किसया प्रकारचा किस कुणालाही केला जाऊ शकतो. पार्टनरपासून ते लहान मुले आणि जे जवळचे असतील त्यांना हा किस केला जातो. या किसमध्ये नाकाचा पुढचा भाग दुसऱ्याच्या नाकाला घासला जातो. या किसमध्ये आपण समोरच्याला अगदी जवळचे मानता अशी जाणीव करून देतात. * फ्रेंच किस प्रेमात आकांत बुडालेले आणि प्रेमात सर्वस्व त्यागाची भूमिका बजावणाºयांसाठीचे प्रतिक म्हणजे फ्रेंच किस. हा किस फक्त लव पार्टनर्समध्येच केला जातो. एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवून ऱ्याच काळापर्यंत हा किस घेतला जातो. याने जवळीकता अधिक साधली जाते. * सिंगल लिप किसया प्रकारचा किसदेखील आपल्या रोमान्सचे प्रतिक आहे. या प्रकारात पार्टनर एकमेकांच्या ओठांना आपल्या ओठात दाबून किस करतात. या किसने आपण पार्टनरच्या प्रेमात किती बुडालो आहोत हे दर्शवितो. * कानाच्या खालच्या भागाला किसहा प्रकार आपण आपल्या प्रेमीसोबत किती मजाकी आहोत आणि प्रेमात काही नवे तसेच एक्साइटिंग करण्याच्या मुड मध्ये आहोत हे दर्शवितो. यात आपण पार्टनरच्या अजून जवळ येण्याच्या तयारीत आहोत असेही दर्शवितो. या किसमध्ये पार्टनरच्या कानाच्या खालच्या भागाला ओठ आणि दाताने हळूवार दाबले जाते. याने समोरचा पार्टनर काही प्रमाणात उत्तेजित होत असतो. * स्पायडरमॅन किस एखाद्या झाडावर झोपाळ्यासारखे उलडे लटकून किंवा सीडीवर बसून जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याचे डोके वर करुन त्याच्या ओठांवर किस करतो त्याला अपसाइड डाउन किस म्हणजे स्पायडरमॅन किस म्हणतात. स्पायडरमॅन चित्रपटात असा किस करण्यात आला होता म्हणून त्याला स्पायडरमॅन किस म्हणतात.