मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तरुणाई या दिवसाची चातकासारखी वाट पाहत असते. जीवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधिपासून वातावरण निर्मितीसाठी व्हॅलेंटाईन विक ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव आजपासून धडाक्यात सुरू झाला.प्रेम व्यक्त करण्यासाठी आकर्षक गिफ्ट्स आणि सेलिब्रेशनची तयारी शहरात सुरू झाली आहे. महाविद्यालयीन तरुणाई हिल स्टेशन, कॉफी शॉप, कॉलेज कॅम्पस, कँटिन येथे व्हॅलेंटाईन पार्टीची तयारी करीत आहे. काही प्रेमी युगुलांनी तर लग्नासाठीच 14 फेब्रुवारीचा मुहूर्त गाठला आहे. व्हॅलेंटाईनच्या अनुषंगाने येणारे विविध डे साजरे करण्यासाठी नागपुरकर तरुणाईने जोरदार तयारी केली आहे. टेडी डे, प्रपोज डे, हग डे, चॉकलेट डे असे विविध डे आठवडाभर साजरे केले जाणार आहे. काल यातील रोज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखेरच्या दिवशी व्हॅलेंटाईन डेचा जल्लोष साजरा केला जाईल. रोज डे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची गरज नसली तरीदेखील ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला की, प्रेमी युगुलांच्या ‘दिल की धडकन’ वाढली नाही असे होणे शक्यच नाही. ‘रोज डे’पासूनच ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात होते असे मानण्याची प्रथा आहे. रोज डे च्या दिवशी मैत्रीचे प्रतीक म्हणून पिवळा, प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाब देण्याची पद्धत आहे.प्रपोज डेप्रेमाच्या या उत्सवाचा हा दुसरा दिवस. या दिवशी प्रेमवीर आपल्या जीवलगासमोर आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करतात. हे करताना हृदयाची स्पंदने वाढलेली असतातच, कारण ज्याच्यासमोर आपण हा प्रेमाचा प्रस्ताव मांडतोय तो होकार देणार की नकार देणार याबद्दल मनात काहुर माजलेले असते. काही नशीबवान असतात, ज्यांना होकार मिळतो, तर काहींना नकार घेऊन माघारी परतावे लागते. चॉकलेट डे प्रेमाच्या सप्तरंगी उत्सवातील तिसरा दिवस चॉकलेटचा. ‘प्रपोज डे’ ला तुम्हाला तुमच्या जीवलगाचा होकार मिळाला असेल तर तुमचे अभिनंदन आता तिला किंवा त्याला भेटायला बाहेर पडणार असात तर सोबत एक मस्त चॉकलेट घेउन जा. कारण चॉकलेटने प्रेमाचा गोडवा अधिक वाटतो. चॉकलेटमधून तयार होणारी रसायने प्रेमाची वाट सोपी करतात. प्रॉमिस डे प्रेमातल्या शपथा आणि वचनांशिवाय प्रेमीयुगुलांचा संवादच पूर्ण होत नाही. इतकीच ही शपथ आणि वचने एकमेकांशी समरूप झाली आहे. व्हॅलेंटाईन वीक मधला चौथा दिवस याच शपथांच्या व वचनांच्या नावी असलेला ‘प्रॉमिस डे’. जेवढा प्रेमाचा इतिहास मोठा तेवढाच शपथांचाही. प्रेमाच्या मुळाशी शपथांचा आधार दडलेला आहे. या सुंदर नात्याची इमारतच मुळी शपथावर उभी राहिली आहे. किस डेया आठवड्यातील पाचवा दिवस म्हणजे ‘किस डे’. आपल्या आवडत्या व्यक्तीप्रती मनात असलेल्या भावनांच्या अभिव्यक्त ीचा चुंबन हा सशक्त पर्याय आहे. मातृप्रीति किंवा स्त्री पुरुष या बाबतीत मात्र चुंबनाची शारीरिक क्रिया ही हृदयात उचबळणाºया भावनांचे केंद्रितभूत प्रतिबिंब असते. जुण्या काळात मराठी काव्यात मात्र बालकवींनी आपल्या प्रेमभावना अतिशय सुंदर शब्दात अभिव्यक्त केली आहे. सुंदरतेच्या सुमनावरचे दव बिंदू चुंबून घ्यावे... या बालकवींच्या ओळी मराठी काव्यात अजारामर ठरलेल्या आहेत.हग डेप्रेम आणि प्रेमपत्र हे समीकरण ठरलेलेच आहे. गुलाबी कागदावर आपल्या प्रियकराला किंवा प्रियसीला चिठ्ठी लिहण्याची गंमत वेगळीच असते परंतु, ह्या दिवशी अस म्हटले जाते. दोन बोटाची चिठ्ठी म्हणजे प्रेम नसते तर एकमेकांना दिलेली घट्ट-घट्ट मिठी म्हणजे प्रेम असते. आलिंगन दिल्याने, मिठी मारल्याने प्रेमाची एक वेगळीच जादू पुढातील व्यक्तीपर्यंत पोहचते. या आलिंगनासाठी, या गळाभेटीसाठी खास दिवस म्हणजे आजचा ‘हग डे’.