lifestyle wear these traditional red dresses to look super stylish in this festive season
फेस्टिव्ह सीझनमध्ये सुंदर दिसण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या टिप्स; ट्राय करा रेड ट्रेडिशनल लूक्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:39 PM1 / 7नवरात्र, दसरा, दिवाळी सणांच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. तरुणाईने ही खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण समारंभात ट्रेडिशनल आणि हटके क्लासिक लूक करण्याकडे सर्वांचा कल असतो. 2 / 7लाल रंग हा नेहमीच सुंदर दिसतो. या रंगाच्या कपड्यांमध्ये सौंदर्य अधिक खुलून येतं. सध्या लाल रंगाचाच ट्रेंड सुरू असलेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील या रंगाने भूरळ पाडली आहे. 3 / 7सोनम कपूरने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यावेळी रेड थीम निवडली होती. सोनमने सुंदर ट्रेडिशनल लूक केला होता जो फेस्टिव्ह सीझनसाठी अत्यंत परफेक्ट आहे. 4 / 7काही दिवसांपूर्वी आलियाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. ज्यावर थ्रेड वर्क करण्यात आलं होतं. यासोबतच तिने सोनेरी रंगाचे झुमके घालणं पसंत केलं. आलियाप्रमाणे तुम्हीही असा लूक नक्की ट्राय करा. 5 / 7दीपिका पादुकोणकडे ट्रेडिशनल ड्रेसेसचं सुंदर कलेक्शन आहे. तिचा प्रत्येक लूक एकदम भारी असतो. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनसाठी दीपिकाची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही. 6 / 7सारा अली खान सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने एका रेड लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 7 / 7faux leather साडी परिधान करून शिल्पा शेट्टीसारखा हटके लूक नक्की करता येईल. सण-समारंभांना अभिनेत्रींप्रमाणे तुम्हीही असा लूक ट्राय करून सुंदर दिसा. आणखी वाचा Subscribe to Notifications