अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची यंदा अखेरची टर्म आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांची दुसरी टर्म संपून ते निवृत्त होणार आहेत.त्यानंतर ओबामा कुुटुंबियांना राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणजेच व्हाईट व्हाऊस सोडावे लागणार. मग ते कुठे राहतील असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आमच्याकडे आहे.कार्यकाळ संपल्यावर बराक ओबामा आपल्या कुटुंबियांसोबत वॉशिंग्टन शहरातीलच केलोरामा भागातील एका आलिशान घरात किरायाने राहणार आहेत.सन 1928 साली बांधण्यात आलेल्या या घरामध्ये नऊ बेडरुमस्, आठ बाथरुमस्, दोन कारचे पार्किंग गॅरेज आहे. तसेच दहा गाड्या उभ्या राहू शकतील एवढे अंगण घरासमोर आहे.8200 चौ. फुटाच्या या घराची दोन वर्षांपूर्वी 5.2 मिलियन डॉलर्समध्ये (सुमारे 35 कोटी रु.) विक्री करण्यात आली होती. त्याआधी येथे व्हाईट व्हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जो लॉकहार्ट व पत्नी जिओवॅन्ना ग्रे राहत असत.ओबामांनी लहान मुलगी साशाचे शालेय शिक्षण (हायस्कूल) पूर्ण होईपर्यंत देशाच्या राजधानीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोठी मुलगी मेलिया 2017मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून मेट्रिक्युलेट होणार आहे. ओबामा राहत असलेल्या घरांचे हे एक्सक्लुझिव्ह फोटो खास तुमच्यासाठी.