Manish malhotra designed kalanks leading actresses looks
'या' डिझायनरने डिझाइन केले 'कलंक'मधील लीडिंग अभिनेत्रींचे लूक्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:53 PM1 / 7सध्या बॉक्सऑफिसवर करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट कलंकची स्टोरी आणि गाण्यांच्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का? या सर्व गोष्टींव्यतिरिक्त सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे, या फिल्ममधील लीडिंग अभिनेत्रींच्या लूक्सची. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने कलंकसाठी कॉस्ट्यूम्स डिझाइन केले आहेत. 2 / 7कलंकमधील प्रत्येक अभिनेत्रीचे आउटफिट्स अगदी वेगळे आहेत. प्रत्येकाच्या भूमिकेनुसार ते डिझाइन करण्यात आले आहेत. 3 / 7माधुरीसाठी हेव्ही लेहंगा आणि ज्वेलरी डिझाइन करण्यात आली आहे. मनीष मल्होत्राने चित्रपटामध्ये बहार बेगमची भूमिका साकरणाऱ्या माधुरी दीक्षितला एका सिंगर आणि डान्सरचा लूक दिला आहे. रेड लेहेंग्यामध्ये माधुरी आणखी सुंदर दिसत आहे. 4 / 7माधुरीच्या कपड्यांवर आणि दागिन्यांवर विशेष लक्ष देण्यात आले. माधुरी ब्लॅक शरारामध्ये डिफ्रंट पण क्लासी दिसत आहे. 5 / 7चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर सगळीकडे आलियाच्याच लूकच्या चर्चा होत होत्या. याबाबत बोलताना मनीषने सांगितले की, आलियाने चित्रपटाच्या एका भागामध्ये हलके आणि पेस्टल कलर्सचे आउटफिट्स वेअर केले आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये डीप शेडचे आउटफिट्स वेअर केले आहेत. 6 / 7कलंकमधील तिसरी लीडिंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जी सत्याची भूमिका निभावत आहे. ती संपूर्ण चित्रपटामध्ये साडीमध्येच दिसून आली. 7 / 7फक्त चित्रपटामध्येच नाही तर कलंकच्या प्रमोशन दरम्यानही या अभिनेत्री जे लूक्स कॅरी करत आहेत ते मनीष मल्होत्रानेच डिझाइन केलेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications