शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंडोमचा डोंगर! फॅशन शोमध्ये कंडोमच्या पसाऱ्यातून मॉडल्सचा वॉक, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 2:07 PM

1 / 8
मिलान फॅशन वीकची सुरुवात यंदा एकदम सरप्राईज डिस्प्लेने झाली. बुधवारी 'रनवे शो'दरम्यान मॉडेल्स कंडोमच्या मोठ्या डोंगरासमोरून चालताना दिसल्या. लक्झरी कपड्यांच्या ब्रँड 'डिझेल'ने फॅशन वीकमध्ये कंडोमच्या पॅकेटचा डोंगर तयार केला ज्यासमोर मॉडेल्स रॅम्पवर चालत होत्या.
2 / 8
ब्रँडने त्याचं न्यू समर/स्प्रींग 2023/2024 कलेक्शन सादर केलं. ज्याची थीम डेनिम कपडे, जो फ्रीडम, प्लेजर आणि एक्सपरिमेंट अशी होती. यादरम्यान मॉडेल्स सुरक्षित सेक्सचा प्रचार करताना दिसल्या, ज्यासाठी सुमारे २ लाख कंडोम पॅकेट्सचा डोंगर तयार करण्यात आला होता. (फोटो सौजन्य - Instagram @diesel)
3 / 8
डिझेल ब्रँडने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. ब्रँडने सांगितले की सेक्स पॉझिटिव्हिटी आणि सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देण्यासाठी मिलान फॅशन वीकमध्ये कंडोम पॅकेट्सचा डोंगर तयार करण्यात आला होता, ज्यासमोर मॉडेल्स चालत होत्या.
4 / 8
मॉडेल्स रॅम्पवर ब्रँडच्या नवीन कलेक्शनचे प्रदर्शन करत असताना, पार्श्वभूमीत कंडोम पॅकेट्सचा डोंगर दिसत होता. या मोहिमेअंतर्गत, कंपनीने एप्रिल २०२३ पर्यंत जगभरात कंडोमचे ३,००,००० बॉक्स देण्याची योजना आखली आहे.
5 / 8
कंडोमच्या डोंगरासमोरून चालताना मॉडेल्सची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या ब्रँडच्या नवीन कलेक्शनलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
6 / 8
मॉडेलने अल्ट्रा लो-राईज जीन्स घातली होती, ज्यात लेस जोडली होती. तिने या जीन्ससोबत ब्रँडचा डेनिम टॉप घातला होता. ज्यासोबत स्टायलिश मिनी टोट बॅग घेतली होती.
7 / 8
काही मॉडेल्स या फॅशन वीकमध्ये फॉल-विंटर कलेक्शन २०२३ चे प्रदर्शन करताना दिसल्या. मॉडेलने मोठ्या प्रिंटसह पफर जॅकेट, ओव्हरसाईज डेनिम शॉर्ट्स आणि गुडघ्यापर्यंत उंच बूट घातलेले दिसले.
8 / 8
याशिवाय, मॉडेल्सने स्लिंकी आउटफिट्स, मोठ्या आकाराच्या हुडीज, सँडल्स आणि अॅक्सेसरीजचे प्रदर्शन केले. मिलान फॅशन वीक २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
टॅग्स :fashionफॅशन