-Ravindra Moreसध्या स्टायलिश राहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. चारचौघात उठून दिसावे असे कुणाला वाटणार नाही. त्यासाठी राहणीमान, वेशभूषा आदी गोष्टींवर मोठा फोकस केला जातो. विशेष म्हणजे लुक चांगला दिसण्यासाठी धडधाकड शरीर किंवा किलर लुक महत्त्वाचा नसून आपण किती स्टायलिश दिसता हे आपल्या व्यक्तित्त्वातून झळकते. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मोस्ट स्टायलिश पीएम आॅफ द वर्ल्ड म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जाणून घेऊया त्यांच्या स्टायलिश लुकबाबत...नरेंद्र मोदी नेहमी स्टाइलमध्ये राहतात. विशेष म्हणजे मोदी जिथे जातात तेथील होऊन जातात. सत्तेच्या तीन वर्षात लोकांनी मोदीचे कित्येक रुप पाहिले. पाहूया, मोदींनी कोणकोणती रुपे धारण केली होती...* १५ आॅगस्टच्या दिवशी लाल किल्ल्याशी निगडित लाल पगडी परिधान करुन मोदींनी देशाला संबोधित केले होते.* गोल्फ खेळताना मोदी आपल्या या लुकमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहेत.* मोदींनी या फोटोत डेनिम ट्राउजरसोबत टेक्सन हॅट घातली होती. * २०१५ मध्ये पीएम मोदी यांनी जेव्हा दहा लाख स्वत:चे नाव लिहिलेला सूट परिधान केला होता तेव्हा खूपच राजकीय वाद झाला होता. * सियाचिनमध्ये सैनिकांशी चर्चा करताना मोदी आपल्या या लुकमध्ये खूपच डॅशिंग वाटत आहेत. * नरेंद्र मोदी यांनी आपल्या शर्टासोबत आपली स्वाक्षरी केलेली शाल परिधान करून दाखवून दिले होते की, ते स्टाइलच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करतात. * जानेवारी २०१५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाच्या भारत दौऱ्या दरम्यान मोदींनी जॅकेटवाला कुर्ता परिधान केला होता. * चीन यात्रेदरम्यान त्यांचा कुर्ता आणि काळ्या चष्म्याची खूपच चर्चा झाली होती. * मोदी जेव्हाही ज्या राज्यांच्या दौऱ्यावर गेले त्यांनी तेथील राज्याची पारंपरिक पोषाख परिधान करून खूपच चर्चेत राहिले. source : Amar Ujala