नवे वर्ष येते तेच मुळात नव्या आशा आकांक्षा घेऊन. नव्या जोमाने नव्या, नव्या उमेद स्वप्न बघायचे. सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आणि नवी वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाले आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा वॉटस अॅपच्याव्दारे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.स्वप्न नवे, दु:ख सारी विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने पाहु. नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा !येणारे नवीन वर्ष आपण सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!