-Ravindra Moreघरातील कामे सहज आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रत्येकाच्या घरात विद्युत उपकरणे आहेत. मात्र घरातील हे उपकरणे निष्काळजीपणाने वापरल्यास कधी धोकेदायक ठरतील सांगता येत नाही. आज आम्ही आपणास आपल्या घरातील अशाच धोकेदायक ठरु शकणाºया उपक रणांविषयी माहिती देत आहोत. * वाटर हीटर बहुतेकजण अंघोळीच्या गरम पाण्यासाठी हीटरचा वापर करतात. बरेचजण निष्काळजीपणाने पाणी गरम करण्यासाठी अंथरुणाजवळच लावतात. अशावेळी आपल्या घरातील मुलांनी त्यामध्ये हात घातला, तर त्याला शॉक लागण्याचा धोका संभवतो.* वॉशिंग मशिन दिल्लीमधील रोहिणी परिसरात तीन महिन्याच्या जुळ्या भावांचा मृत्यु वॉशिंग मशिनमुळेच झाला. वॉशिंग मशिनमधले घुसळणारे पाणी पाहून लहान मुले त्याकडे आकर्षिले जातात. त्यामुळे वाशिंग मशिन लहान मुलांना धोकेदायक ठरु शकते. यासाठी वापरताना काळजीपूर्वकच वापरावे. * इस्त्रीआज प्रत्येकाला ऐटीत राहण्याची सवय झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्रीचा वापर होत आहे. मात्र इस्त्री वापरताना निष्काळजी केल्यास किंवा इस्त्रीमध्ये वीजेचा प्रवाह उतरल्यास इस्त्रीचा वापरही धोकेदायक ठरु शकतो. * टेबल फॅन सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाळ्यापासून मुक्ती मिळण्यासाठी बरेचजण टेबल फॅनचा वापर करतात. मात्र हा फॅन हा लहान मुलांसाठी घातक ठरु शकतो. या फॅनची पाती फिरत असताना मुले त्याकडे आकर्षिले जातात आणि जाळीच्या आत बोट घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना इजा होऊ शकते. * हेअर ड्रायर धावपळीच्या आयुष्यात सध्या प्रत्येकाच्या घरात हेअर ड्रायरचा वापर होताना दिसत आहे. मात्र हे हेअर ड्रायर आपल्या मुलांच्या हातात पडले तर त्यांच्यासाठी ते धोकेदायक ठरु शकते. हेअर ड्रायरमुळेदेखील अनेक दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.* गिझर गिझरदेखील तेवढेच धोकेदायक ठरु शकते. गिझरचा स्फोट होण्याच्या घटना आपण ऐकल्याच असतील. यासाठी गिझरचा वापर नेहमी सावधगिरीनेच करायला हवा. * पॉवर प्लग/स्विचआज प्रत्येकाकडे विद्युत उपकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पॉवर स्विचचा वापरही वाढतच आहे. मात्र हे पॉवर प्लग किं वा स्विच भिंतीवर अतिशय खाली लावत असाल तर ते आपल्या मुलांसाठी फार धोक्याचे ठरु शकते. कारण लहान मुलं खेळण्याच्या नादात त्याच्या छिद्रात बोटं घालू शकतो. यात मुलाला हाय व्होल्टेजचा वीजेचा धक्का त्याला बसू शकतो.