Perfect hairstyles for summer wedding
Cooool.... उन्हाळ्यातील लग्नसमारंभात 'या' 5 हेअरस्टाइल करा, चिंता विसरा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 2:36 PM1 / 6एप्रिल - लग्न समारंभ म्हणजे आनंदाचा क्षण असतो. मात्र उन्हाळ्यात लग्न आणि तेही दिवसा. कल्पनादेखील नकाशीच वाटते. अशा समारंभामध्ये सुंदर दिसावं म्हणून आपण आपल्या सौंदर्याची योग्य ती काळजी घेतो. लग्नसमारंभात मुख्यतः मेकअप-हेअरस्टाइलला प्राधान्य दिलं जातं. आर्टिफिशियल किंवा ख-या फुलांचा जास्तीत जास्त वापर करून विविध केशरचना केल्या जातात. मुख्य समारंभाच्या वेळी केशरचना करताना काही काळजी मात्र जरूर घ्यावी. उन्हाळ्यातील लग्नसमारंभात खालील 5 हेअरस्टाइल नक्की करुन पाहा.2 / 61. वेणीची हेअरस्टाइल काही स्त्रियांचे केस घनदाट आणि लांब असतात. लग्नात दिवसभर केस व्यवस्थित राहावेत, यासाठी केसांची वेणी घालून केलेली हेअरस्टाइल नेहमीच चांगली दिसते.3 / 62. पारंपरिक अंबाडा आजकाल अंबाडामध्येही खूप प्रकारच्या स्टाइल करता येतात. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता जास्त असल्याने केसांचा उंचावर अंबाडा घातल्यास तुम्हालाही सुटसुटीत वाटू शकतं.4 / 63. साईड पार्टेड केस एका बाजूस घेऊन नावीन्यपूर्ण हेअरस्टाईल करता येते. केस कुरळे करून किंवा एका बाजूस वेणी घालून कोणत्याही ड्रेसवर तुम्हाला ही हेअरस्टाइल करता येऊ शकते.5 / 64. केस कुरळे करणे उन्हाळ्यात केसांवर स्प्रे वापरल्यास केस खराब होतात. यावेळी केस कुरळे करणे चांगला पर्याय ठरू शकतो.6 / 65. पोनीटेल पोनीटेल्स ही प्रत्येक मुलीची आवडती हेअरस्टाईल. या स्टाइलमध्ये काही केसांचा वापर पोनीटेलसाठी रबर बँडप्रमाणे बांधण्यासाठी केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications