चॅम्पियन ट्रॉफीसाठी ४ जून रोजी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार असून सर्व क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चाहत्यांच्या अपेक्षा भारतीय क्रिकेटर्स कडून मोठ्याप्रमाणावर असून भारतीय क्रिकेटर्सदेखील सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेटर्स स्वत:ला रिफ्रेश करताना दिसत आहेत. भारतीय टीममधील खेळाडू इंग्लंडमध्ये मिळेल तसा फावला वेळ आपापल्या पद्धतीने घालवत आहेत. काही खेळाडूंनी लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली तर काहींनी तेथील प्रसिद्ध फूडवर ताव मारणे पसंत केले. चला जाणून घेऊया क्रिकेटर्स कसे एन्जॉय करीत आहेत ते. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी आणि दोन मुलांसमवेत एका हॉटेलमधला फोटो शेअर केला आहे. सोबतच उमेश यादव आणि त्याची पत्नीही दिसत आहे.डिनर टाईमवेळी भारतीय क्रिकेटर्स.. टीम बसमध्ये शिखर धवन, अजिंक्य रहाणे (डावीकडे मागे) आणि रोहित शर्मा ... खेळाडूंनी बोटिंगचीही मजा घेतली... रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मेट्रोतून प्रवास करताना.... हार्दिक पांड्याने लंडनचा प्रसिद्ध ब्रीजला भेट दिली... वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर स्ट्रीट फूडची मजा लुटताना... फावल्या वेळेत फिरताना टीम इंडिया... रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा