- सारिका पूरकर-गुजराथीघराची मुख्य बैठक असू देत किंवा बेडरुम. ओक्या बोक्या भिंती बघितल्या की कसंसच होतं. आता भिंती सजवायचं म्हटलं तर पेंटिंग्ज, फ्रेम्स, फोटोज हेच पर्याय नेहमी हाताळले जातात. पण हे पर्याय टाळून आपल्या स्वत:च्या हातानं आणि कल्पकतेनंही भिंतींना सजवता येतं. अशा भिंती जेवढं सुखं आपल्याला देतात तितकंच पाहुण्या मंडळींनाही.पोलका डॉट्सयासाठी भिंतींवर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी गोलाकार काढायचे आहेत. पोकळ नव्हे तर भरलेले. बाजारात विविध रंगात, आकर्षक डिझाईन्समध्ये वाशी टेप मिळतात. त्यापासून हे गोलाकार बनवा आणि भिंतीवर ठराविक अंतरावर लावून सुंदर फील मिळवा. थ्रीडी कलरब्लॉकबाजारात थ्रीडी कलरब्लॉक मिळतात. ते देखील आकर्षक रंगसंगतीत आंओ गोलाकारातील घ्या आंओ भिंतींवर त्याची कल्पक रचना करुन भिंतीला हटके लूक द्या.टी कप पेंटिंगएरवी बैठकीत छान छान पेंटिंग्ज लावली जातात. किचनला कोणी विचारतच नाहीत. किचनमध्ये तुम्हाला क्राफ्टी लूक द्यायचा असेल तर आर्ट पेपरमधून चहाचा कप, चहाची बशी आणि किटली असे आकार कापून घ्या. किटलीचा एक आणि कप-बशीचे चार-पाच आकार कापून घ्या. एका प्लेन कागदावर या कप-बशींना, किटलीला चिकटवून टाका. रचना मात्र सुंदर हवी. प्रत्येक कप-बशीसाठी वेगळा आणि आकर्षक रंगाचा कागद वापरा. हा कागद किचनमध्ये लावावा. तसेच तो फ्रीजवर, कपाटांच्या दरवाजांवरही लावू शकता. मेसेज करा अरेंजहा एक फन फंडा म्हणून ट्राय करा. तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो अगदी कमी शब्दात असेल असा निवडा. म्हणजे सेव्ह वॉटर, सेव्ह ट्रीज किंवा अन्न नासाडी टाळा. या संदेशातील अक्षरं एका छोट्या चौकोनी कागदावर ठळक मार्करनं काढून घ्या. हे कागद एका छोट्या क्लिपबोर्डवर अडकवा (परीक्षेला आपण वापरतो ते पॅड). आणि हे सर्व क्लिपबोर्डवर भिंतीवर लावा. अक्षरांची उलटसुलट रचना करा. घरी पाहुणे आल्यास त्यांना या अक्षरांमध्ये दडलेला संदेश शोधायला सांगा. त्आहे की नाही गंमत.या अशा कल्पनेतून भिंती सजतातही आणि त्यांना सोशल टच ही मिळतो.कागदी पंखेलहानपणी गंमत म्हणून कागदाला घड्या घालून पंखे बनवलेत ना तुम्ही ? मग त्याच पंख्यांचा वापर आता भिंत सजवण्यासाठी करायचाय तुम्हाला. फक्त त्यासाठी रंगीत आणि चांगल्या प्रतीचे आर्ट पेपर वापरा आणि लहान आकारात गोलाकारात हे पंखे बनवा. असे विविध रंगात खूप सारे पंखे बनवून झाले की त्याची आकर्षक रचना भिंतीवरील फोटोंभोवती करा किंवा प्लेन भिंतीवर करा. छानच दिसेल! पंच आर्टपेपर पंच हा अगदी सोपा प्रकार आहे. लहान मुलंही ते आरामात करतात. रंगीत पेपर आणि विविध पाना-फुलांचे भौमितीय आकारांचे पंच मशीन मुलांना देऊन टाका. पंच करुन आकार कापून कापलेल्या आकारांची रचना प्लेन कागदावर करा. झाले आर्टपीस तयार.रिबन आर्टबाजारात अनेक रंगांमध्ये व कमीअधिक रुंदीच्या सॅटिन रिबन्स मिळतात. तुमच्या आवडीच्या चार-पाच रंगांच्या आणि मध्यम रुंदीच्या (५ ते ८ सेंमी रुंदीच्या )रिबन्स घ्या. चार चौकोनी कागदाचे तुकडे (१० बाय १४ इंच) घ्या. प्रत्येक तुकड्यावर रिबनचे तुकडे आडवे-उभे न चिकटवता तिरपे चिकटवत चला, चिकटवताना योग्य अंतर (खूप जवळ व खूप दूर नको) आणि रंगसंगतीवर भर द्या. चारही तुकड्यांना एकत्र जोडल्यावर रिबनची टोकं एकमेकांना जुळतील असं बघा. चारही तुकडे बनवून झाले की एका दुसऱ्या मोठ्या कागदावर हे तुकडे जवळजवळ चिकटवून टाका. फ्रेम करून लावा भिंतीवर. हार्ट आर्टबाजारात विविध रंगात पेण्ट चीप्स अर्थात रंगीत आर्ट पेपरचे तुकडे मिळतात. त्या पेपरमधून हार्टचे आकार पंच मशीनच्या सहाय्यानं कापून घ्या. रंगसंगती निवडताना शेडिंगवर भर द्या. म्हणजे एकाच रंगाचे नकोत. भरपूर आकार कापा. चार कॅनव्हासच्या तुकड्यांवर एका रांगेत हे आकार चिकटवा. त्यासाठी अॅडेसिव्ह फोम सर्कलचा वापर करा. म्हणजे थ्रीडी लूक येईल. चारही कॅनव्हासवर चिकटवून झाले की फ्रेम करा आणि चारही फ्रेम्स भिंतीवर अरेंज करा.प्लोटिंग वॉल आर्टतुमच्याकडे शूज, सॅण्डल्स यांचे रिकामे खोके धुळ खात पडले असतील आणि ते तुम्ही फेकण्याच्या विचारात असाल तर तसे करु नका. त्याऐवजी हा फंडा ट्राय करा. खोक्यांची झाकणं घ्या. काही आकर्षक रंगसंगतीचे वापरात नसलेले कापडाचे तुकडे घ्या. मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं कापड झाकणावर चिकटवून टाका. पुन्हा एक कोट द्या. असे विविध कापड लावून पाच- ते सहा झाकणं तयार करा आंओ भिंतीवर आर्ट पीस म्हणून रचना करा. झाकणाला आकर्षक कागद चिकटवून आतील बाजूवर तुमचे फोटोज देखील तुम्ही चिकटवू शकता आणि भिंतीवर ते लावू शकता. खोक्याच्या आतील आणि बाहेरील बाजूंवर ब्राईट रंग देऊन घ्या. आत आणि बाहेर वेगळे रंग हवे. चार-पाच खोके रंगवून झाले की पेंटर्स टेपच्या सहाय्यानं हे खोके भिंतीवर शेल्फ म्हणून चिकटवा. यात तुम्ही छोट्या सजावटीच्या वस्तू सहज ठेवू शकता.