वाडियार राजघराण्याचे महाराज यदुवीर आज सोमवारी (27 जून) विवाह बंधनात अडकले. राजस्थानमधील डूंगरपूरची राजकुमारी तृषिका सिंहसोबत यदुवीर यांनी लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी यदुवीर यांचा राज्याभिषेक झाला होता. म्हैसूरमध्ये मंडप पुजे सह लग्नाच्या विधींना शनिवारपासून सुरुवात झाली. सकाळी 9.05 ते 9.40 दरम्यान म्हैसूर पॅलेसच्या कल्याण मंडपमध्ये विवाह विधी पार पडले..त्याधी 25 जून रोजी सकाळी यदुवीर यांना येन स्नान (आॅइल बाथ) करण्यात आला रविवारी एका खासगी समारंभात काशी यात्रा विधी झाला. लग्नाच्या दिवशी म्हणजे आज यदुवीर आमि तृषिका झोपाळ्यावर झोके घेतील आणि त्यानंतर फुलांनी तयार केलेल्या बॉलसोबत खेळतील. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता दरबार हॉलमध्ये ग्रँड रिसेप्शन दिले जाईल. या शाही जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी 2000 पाहूणे येणार आहेत. त्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश असेल. यदुवीर यांचे सासरे - तृषिकाचे वडील हर्षवर्धन सिंह यांची नुकतीच भाजपच्या तिकीटावर राज्यसभेवर वर्णी लागली आहे. भारतातील राजघराण्यांपैकी सर्वात जुने (619 वर्षे) राजघराणे म्हणून म्हैसूरच्या वाडियार घराण्याची ओळख आहे. 24 वर्षांचे महाराज यदुवीर वडियार मागील वर्षी अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स विद्यापाठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्रात पदवी घेऊन परतले आहेत. महाराज झाल्यानंतर ते कृष्णदत्ता चामराजा वाडियार नावानेही ओळखले जात आहेत. गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला महाराणीने त्यांना दत्तक घेतले होते आणि राजा करण्याची घोषणा केली होती. वाडियार घराण्याने 1399 पासून म्हैसूरवर राज्य करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून राजाची घोषणा होत आली आहे. यापूर्वी 1974 मध्ये राज्याभिषेक झाला होता. तेव्हा यदुवीर यांचे काका श्रीकांतदत्ता नरसिंहराजे वाडियार हे गादीवर बसलेले होते. 2013 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षे गादी रिकामी होती. त्यानंतर यदुवीर यांना राजा करण्यात आले. श्रीकांतदत्ता नरसिंहराजे वाडियार आणि राणी गायत्रीदेवी निपुत्रीक होते.