-Ravindra Moreबदलते राहणीमान आणि धावपळीची जीवनशैली यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढत आहे, ही समस्या पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात असून अवेळीच डोक्याला टक्कल पडत आहे. बऱ्याचदा डोक्यावर कमी केसांमुळे आपणास हवी तशी हेअरस्टाईल करता येत नाही. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वेगळीच पडते त्यामुळे काही ठिकाणी तर लाजिरवाणेही व्हावे लागते. मात्र आता घाबरु नका, आपल्या डोक्यावर जरी कमी केसं असतील तरी अशा काही हेअरस्टाईल आहेत ज्याने आपला लूक आकर्षक वाटेल. * कोंब ओव्हरकोंब ओव्हर हा काही कट नसून केस विंचरायची एक पध्दत आहे. डोक्यावर ज्या भागात केस कमी आहेत त्या भागावरून बाजूचे केस कंगव्याच्या साहाय्याने फिरवल्यामुळे थोडा वेगळा लूक येऊ शकतो.* द रिसीडर हेअरस्टाईलया हेअरस्टाईलमध्ये साईडचे आणि मागचे केस लहान ठेवत डोक्याच्या वरच्या भागातले केस मोठे ठेवले जातात. यामुळे केसांचा थिकनेस जास्त असल्याचा लूक येतो.* बझ कट डोक्यावरचे केस अगदीच कमी असतील तर या कटचा आॅप्शन आहे. बझ कटमुळे एक रफ लूक मेंटेन करता येतो. यामध्ये संपूर्ण डोक्यावरचे केस झिरो मशीनने बारीक केले जातात. यावेळी स्टायलिस्टला झिरो मशीनचं २ किंवा ३ नंबरचं रेझर वापरायला सांगावं.* दाढी वाढविणेदाढी आणि केसांचं वेगवेगळं काँबिनेशन करत वेगळा लूक आणता येतो. डोक्यावर केस कमी असले तर दाढी वाढवत त्याबरोबर हेअरस्टाईल कोआॅर्डिनेट करणंही शक्य असतं. सध्या दाढी किंवा स्टबल ठेवण्याचा लूक इन आहे. त्यामुळे दुहेरी फायदा होऊ शकतो. या पध्दतीत दाढीच्या केसांची लांबी आणि डोक्यावरच्या केसांचा लूक कोआॅर्डिनेट करावा लागतो. हे ऐकायला कठीण वाटत असलं तरी चांगल्या हेअरड्रेसरकडे जात त्याच्या सल्ल्याने हा लूक सहज मिळवता येऊ शकतो.Also Read : मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल ! : हेअर कलर निवडताना !