हॉलिवूडची स्टार्स असलेली ही मंडळी आपापल्या देशातून भारताच्या दिशेने निघतात. त्यांचा हा प्रवास पाहणार्यांना वाटते की ते भारतात जाऊन त्यांना एखाद्या सिनेमाचे प्रमोशन किंवा एखादा व्यावसायिक करार करायला तिकडे जात असतील. पण, प्रत्यक्षात ते भारतात येतात केवळ गरीब, पीडित व गरजूंना मदत करण्यासाठी. या हॉलिवूड स्टार्सच्या मदतीमुळेच अनेक भारतीयांना जीवनाची दिशा मिळाली आहे. त्याच्या विधायक कायार्चा हा आढावा.. मॅट डीमन (स्वच्छ पेयजल) :आॅस्कर पुरस्कार विजेता हॉलिवूड अभिनेता मॅट डोमोन २00९ साली पहिल्यांदा भारतात आला होता. तेही दिल्लीला. मॅटची फाऊंडेशन आफ्रिकेतील लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी काम करते. हाच उपक्रम भारतातही राबवावा, असे या कलाकाराला वाटले. त्यामुळे त्यावर सविस्तर नियोजन करून आॅगस्ट २0१३ मध्ये त्याने पॉँडेचरी, चेन्नई, बेंगळुरू येथे भेट देऊन 'वॉटर डॉट आॅर्ग'ची माहिती घेतली. याच विषयावर आता तोही भारतात येऊन काम करत आहे.मॅँडी मुर (लैंगिक हिंसा) :आपली 'बबलगम पॉप' इमेज बदलवून प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मॅँडी मुर ही मागील महिन्यात भारतात आली होती. या भेटीत लैंगिक हिंसा या समस्यकडे तिने लक्ष वेधले. मुर ही पीएसआय (पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल) या संस्थेबरोबर २00८ पासून काम करते आहे. मुरने पटना, लखनऊ, दिल्ली येथील ग्रामीण भागातील लैंगिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या महिलांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिल्लीच्या जंगपुरासारख्या झोपडपट्टीतील महिलांचीही तिने भेट घेतली.लिओनार्ड डिकॅप्रिओ (पर्यावरण) :लिओनार्ड डिकॅप्रिओ चार दिवसांसाठी भारतभेटीवर येत आहे. वातावरणातील बदल (क्लायमेट चेंज) या विषयावर तो दिल्लीपासून भारतातील काही भागात फिरुन एक डाक्युमेंट्री करणार आहे. लिओ हा जगभरातील पर्यावरण व जैवविविधता या विषयावर होत असलेल्या विविध संस्था, संघटनांच्या कामांमध्ये सहभाग देत असतो. भारतात तो सुनीता नारायण, विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्या संचालक यांची मुलाखत घेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे ही त्याची याच विषयावरील दुसरी डाक्युमेंट्री फिल्म असणार आहे. यापूर्वी त्याने 'इलेव्हन्थ अवर' ही डाक्युमेंट्री फिल्म स्वत:च तयार केली होती.जॅकी चॅन (शिक्षण) :जुन २0१३ मध्ये जेव्हा जॅकी चॅनने दिल्लीत येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांने मार्शल आर्टविषयी सोप्या सोप्या टीप्स तर दिल्याच शिवाय शिक्षणाविषयी प्रेरणात्मक असे व्याख्यानही दिले होते. त्याचे व्याख्यान ऐकून तेथेच मुलांनी शिक्षण पूर्ण करून जीवनात यशस्वी व्हायचे, असा निश्चय केला होता. मुलांना दिलेल्या व्याख्यानात जॅकी म्हणाला होता की, 'एखाद्या देशाचे सौंदर्य हे त्या देशातील माणसे, मुख्यत्वे तेथील मुलांवरून ठरते. या मुलांना चांगले शिक्षण देऊन उद्याचे आदर्श नागरिक बनविणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.'रिचर्ड गेअर (तिबेटमुक्ती संग्राम) :भारताला नियमितपणे भेट देणारा रिचर्ड गेअर हा आणखी एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आहे. तिबेटियन बौद्ध विचारसरणीचा गेअरवर खूप प्रभाव आहे. आता तर तो तिबेटमुक्ती संग्रामाचा सक्रिय कार्यकर्ताच झाला आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात गेअर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तिबेट, बौद्ध धर्म, दलाई लामा त्यांचे प्रश्न याविषयी सविस्तर चर्चा केली होती.