- सारिका पूरकर-गुजराथीकला-कुसरीच्या वस्तुंनी केवळ घरातला हॉल, बैठकखोली किंवा बेडरुमचं सजवता येते असा समज असेल तुमचा तर तो आधी दूर करा. कारण किचनमध्येही तुम्हाला क्राफ्टी लूक द्यायला बराच वाव असतो. उलट किचनमधील कला-कुसर तर फार सोपी आहे. फार झंझट नसते त्यात.एखादं काही केलं तरी कळकट वाटणारं आपलं किचन एकदम कलात्मकही दिसू शकतं. किचनमधल्या कलाकुसरीची हीच तर कमाल आहे.किचनमधली कलाकुसर१) चहा, कॉफीचे मोठे मग असतील तर त्यावर नवीन रंगाचा प्लेन वॉश देऊन घ्या. वाळला की मग त्यावर शार्पी पेन (मार्करसारखे पेन ), अॅक्रेलिक रंगांनी आवडीचे डिझाईन्स बनवा. कधी नुसतेच ठिपके द्या रगांचे, कधी नावाची आद्याक्षरं रंगवा नाहीतर पानं-फुलं अन कार्टून रंगवा. २) लाकडी चमचे असतील तर त्यांच्या हॅण्डलवर आवडीचा रंग द्या. पूर्ण चमचा रंगवायचा नाहीये. फक्त हॅण्डलचा काही भाग रंगीत करायचा आहे. निआॅन रंगात रंगवलं तर अजून छान दिसेल. रंगवायची सोपी पद्धत म्हणजे चमच्याचे हॅण्डल थेट रंगात बुडवून निथळून घ्या. वाळू द्या. ते रंगीत चमचे पण खूप सुंदर दिसतात. स्टीलच्या चमच्यांनाही तुम्हाला याच प्रकारे कलरफूल बनवता येईल.३) काही कंटेनर्स, जार्स असतील तर त्यावर लेबल पेंट करा. त्या त्या कंटेनरमधील वस्तूचं नाव लेबल पेंट करुन घाला. हे हटके लेबल्स फक्त तुमच्याकडेच असतील, अक्षरं जर कॅलिग्राफिक स्टाईलनं पेंट केलेत तर आणखी छान दिसेल.४) काही जार्सची लीड (झाकणे) प्लेन पांढऱ्या रंगात रंगवून टाका. एरवी कलरफूल लीड्स असतातच म्हणून हा लूकही कधीकधी छान दिसतो, चेंजही होतो. ५) प्रोटीन पावडरचे रिकामे टीन असतील तर त्याभोवती सुतळी गुंडाळून स्पून रॅक , स्पून होल्डर तयार करता येतो. रस्टिक स्पून होल्डर काही मीनिटा तयार होतो. याच टीनला बाहेरुन आवडीचा रंग देऊन खिळ्यानं काही छिद्रं पाडून घ्या. यात लाईट (बल्ब) सोडा, छान पेण्डंट लॅम्प तयार होतो.६) बाजारात रेडिमेड पॉलिश्ड पेबल्स मिळतात (नदी, समुद्र किनारी सापडतात तेच दगड-गोटे फक्त पॉलिश केलेले आणि विविध आकारात असतात) त्यात मध्यम आकाराचे पेबल्स निवडा. प्लायवूडचा छोटा गोलाकार, चौकोनी तुकडा घेऊन त्यावर हे पेबल्स जवळ-जवळ चिकटवून घ्या. वाळू द्या. किचनमध्ये एक सुंदर कोस्टर तयार होतं.७) हॅण्ड मिक्सर वापरत असाल तर त्यालाही तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगात रंगवून कलरफूल लूक देऊ शकता.८) वाशी टेपच्या सहाय्यानं किचन कॅबिनेट्सच्या बॉर्डर्सला डेकोरेटिव्ह बनवता येतं.९) जुने स्टीलचे ग्लास जे वापरत नसाल ते एका अशाच वापरात नसलेल्या एखाद्या पोळपाटावर (शक्यतो लाकडी घ्या) चिकटवून टाका. एका पोळपाटावर तीन ग्लास आरामात बसतात.यात चमचे, सुरी, रवी असे सर्वकाही ठेवू शकता. झाले तुमचे आर्टिस्टिक स्पून होल्डर तयार.