-Ravindra Moreमहिला फक्त पुरुषांचे कपडे आणि हेअरस्टाइलच नोटिस करत नाही, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याकडे महिलांचे अगदी बारकाईने लक्ष असते, ज्याची माहिती स्वत: पुरुषांनाही नसते. या गोष्टी लक्षात आल्यानंतर महिलांसमोर नक्कीच पुरुषांचा प्रभाव कमी होतो. चला मग जाणून घेऊया, त्या गोष्टींबाबत...* नाकाचे केसपुरुषांच्या नाकात वाढलेले केस महिला त्वरित नोटिस करते. यासाठी पुरुषांनी नेहमी आपल्याजवळ एक ट्रिम्मर ठेवावे आणि वेळोवेळी केसांना साफ करावे.* रेजरने लागलेला कटचुकीच्या पद्धतीने केलेल्या शेविंगमुळे चेहऱ्यावर रेजरने कट लागतो आणि आपला चेहरा खराब दिसायला लागतो. पुरुषांच्या चेहऱ्यावरील हे कट्स महिलांच्या लगेच लक्षात येतात. यासाठी शेविंग करताना नेहमी काळजी घ्यावी जेणेकरुन आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब होणार नाही. * श्वासाची दुर्गंधीजेव्हापण आपण आपल्या पार्टनर सोबत असतो तेव्हा आपला श्वास त्यांना गुड फीलिंग देतो. मात्र जर आपल्या श्वासात दुर्गंधी असेल तर महिलांच्या लगेच लक्षात आणि त्या दुरावा निर्माण करतात. यासाठी श्वासाच्या दुर्गंधीला दूर ठेवा. यासाठी आपले दात आणि तोंड नेहमी स्वच्छ ठेवा.* ब्लॅकहेड्सपुरुषांच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स महिलांपासून लपत नाहीत. यासाठी आपला लूक आणि इंपे्रशनला खराब होण्यापासून वाचविण्यासाठी या ब्लॅकहेड्सला दूर करण्याचा उपाय करावा. मात्र यांना हाताने काढण्याची चुक अजिबात करू नये. * शरीराची दुर्गंधीजर आपल्या शरीराची दुर्गंधी येत असेल तर आपल्या जवळ कोणतीच महिला बसू शकत नाही. यासाठी आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे. यासाठी नियमित अंघोळ करावी आणि अंघोळ करताना साबुन आणि शॅँपूचा वापर करावा. * खूप जास्त परफ्यूमचा वापरबहुतेक पुरुषांना खूप जास्त परफ्यूम किंवा डीओ वापरण्याची सवय असते. महिला अशा पुरुषांना लगेच नोटिस करते आणि त्यांच्यापासून लांब राहते, कारण जास्त प्रमाणात परफ्यूम वापरणे त्यांना आवडत नाही. यासाठी परफ्यूम वापरा मात्र प्रमाणात. * डॅँड्रफमहिला पुरुषांच्या केसांमधून पडणाऱ्या डॅँड्रफला सहज नोटिस करते आणि अशा पुरु षांपासून ती दूर राहणेच पसंत करते. यासाठी या समस्येकडे आवर्जून लक्ष द्यावे. ही समस्या आपल्या केसांचे तर नुकसान करते शिवाय आपल्या पार्टनरसोबतचा दुरावादेखील वाढविते. * पिवळे दातआपल्या हास्याने कोणत्याही महिलेचे मन जिंकण्यासाठी आपल्या दातांना नेहमी साफ आणि चकमदार ठेवा. पुरु षांचे पिवळे दात महिला त्वरित नोटिस करतात.