-सारिका पूरकर-गुजराथीपूर्वी घराच्या भिंती रंगवण्यासाठी आकर्षक रंग नव्हते, वॉलपेपर्सचा तर प्रश्नच नव्हता. मातीनं, शेणानं भिंती सारवून त्यावर हातानं जमेल तशी चित्रं चितारुन भिंती सजवल्या जात असत. वारली चित्रकला, मधुबनी चित्रकलेचा उगम यातूनच झाला. निसर्ग, मानवी संबंध याचेच प्रतिबिंब या चित्रशैलीत आहे. थोडक्यात स्वत:च्या हातानं भिंतीवर चित्रं काढण्याचा हा ट्रेण्ड आता नव्यानं लोकप्रिय झाला आहे. वॉल पेंटिंग हा होम डेकोरमधील सर्वात क्रिएटिव्ह आॅप्शन बनला आहे. या पेंटिंगमुळे घरातील मोठ्या भिंती सहज डेकोरेट होतात आणि भरीव दिसतात. शिवाय आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्याचाही फील येतो.१) झाडं आणि पानंहे डिझाईन वॉल पेंटिंगमध्ये खूप लोकप्रिय आहे. काळा,तपकिरी या दोन रंगांत हे डिझाईन विशेष खुलून दिसतं. भिंतीवर झाडाचा आकार रेखाटून त्याच्या फांद्या, बारीक पानं, त्यावरचे पक्षी हे फक्त प्लेन रंगात रंगवले जातात. दिसायला अगदी सुंदर आणि पर्सनल टच मिळतो. हॉलमध्ये सोफ्यामागची जी भिंत असते, तेथे हे पेंटिंग केलं जातं. तसेच बेडरुममध्ये बेडमागच्या भिंतीवरही केलं जातं. याच डिझाईनमध्ये झाडांच्या फांद्यांवर मधून-मधून तुम्ही फॅमिली फोटोज फ्रेम करुन लावल्यास फॅमिली ट्रीचा फील येतो. झाडाच्या फांद्याच्या ठिकाणीच काही शेल्फ बसवून त्यावर वस्तू ठेवल्यास शेल्फचा एक वेगळा प्रकारही होतो. २) प्राणी-पक्षीमुलांच्या खोलीत हे डिझाईन्स रेखाटून घरातच झू तयार होतं. रंग मात्र काळा, तपकिरीच हवा, रंगीबिरंगी नको.3. फ्री हॅण्ड डिझाईन मुक्त छंद प्रकारातील कोणतंही डिझाईन भिंतीवर रेखाटून हे डिझाईन देखील काळा, तपकिरी रंगात रंगविल्यास शोभून दिसतं. हा प्रकार बेडरुममध्येही सूूट होतो. हार्ट शेप, फुलपाखरं यांचे विविध आकार चितारता येतात. घरातील कमानीवर, जिन्याच्या बाजूच्या भिंतीवरही हे छान दिसतात. ४) बबल्स डिझाईनविविध वर्तुळाकार एकात एक गुंफून बबल्स डिझाईन तयार होतं. आऊटलाईन आणि आतील भाग भरीव या पद्धतीचे हे बबल्स अॅबस्ट्रॅक्ट लूक देतं. हे डिझाईन रंगवायलाही सोपं जातं. आकार बिघडण्याचे चान्सेसच नाहीत.५) इमारती आणि संगीतातील नोट्सतुम्हाला संगीत आवडत असेल तर सुरांच्या नोट्स, स्वरलहरी भिंतीवर चितारता येतात. तसेच आधुनिक, मॉडर्न टच घराला द्यायचा असेल तर एकाला एक लागून इमारतींचे आऊटलाईन चितारुन सिटीलाईट फ्रेम उभी करता येते. ६) जशी रुम तसं पेंटिंगवर नमूद केलेले डिझाईन्स हे काही बेसिक आणि लोकप्रिय डिझाईन्स आहेत. मात्र घरातील प्रत्येक रुममध्ये त्या त्या रुमला साजेसं पेंटिंगही भिंतीवर करता येतं. किचनमध्ये फळं, भाज्या चितारता येतात. मुला-मुलींच्या खोलीतही कार्टून्सबरोबरच अल्फाबेट्स, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग साकारता येतात. याशिवाय कलरफूल वेव्ह्ज (लाटा), चेहरे (आऊटलाईन वर्क), स्ट्रिप्स (पट्टे), चेक्स (चौकटी),ब्रिक्स, जॉमेट्रिक आकार देखील भिंतीवर रेखाटून भिंत सजवण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय झाला आहे.