शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:44 PM

1 / 6
अमिताभ बच्चन- वयाची पंचाहत्तरी ओलांडलेली असतानाही अमिताभ बच्चन अतिशय आव्हानात्मक भूमिका अगदी लिलया साकारतात. मात्र अमिताभ बच्चन यांना विमानदेखील उडवता येतं, हे फारच कमीजणांना माहीत आहे. गरज पडल्यास मी विमान उडवू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करण्याचं कौशल्य मी आत्मसात केलं आहे, असं बिग बी यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितलं होतं.
2 / 6
सुशांत सिंग राजपूत- काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंगनं विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली. त्यानं आगामी चंदा मामा दूर के चित्रपटासाठी हे प्रशिक्षण घेतलं.
3 / 6
गुल पनाग- उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमावल्यानंतर गुल पनामनं विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. विमान उडवणं हे गुल पनामचं स्वर्न होतं. ते तिनं पूर्ण केलं.
4 / 6
असिन- विमान उड्डाणातील आपलं कौशल्य इटलीत दाखवून दिलं. यावेळचे फोटोदेखील तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
5 / 6
विवेक ओबेरॉय- क्रिश-3 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विवेकनं विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे विवेककडे विमान चालवण्याचा परवाना आहे. तो दोन आसनी विमान सफाईदारपणे उडवू शकतो.
6 / 6
शाहिद कपूर- मौसम चित्रपटासाठी शाहिद विमान चालवायला शिकला. शाहिद कपूर कधीही डमीचा वापर करत नाही. त्यामुळेच या चित्रपटासाठी शाहिदनं विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. एफ-16 लढाऊ विमानं उडवू शकणारा शाहिद हा बॉलिवूडमधला एकमेव अभिनेता आहे.
टॅग्स :airplaneविमानAmitabh Bachchanअमिताभ बच्चनShahid Kapoorशाहिद कपूरGul Panagगुल पनागVivek oberoyaविवेक ऑबेरॉयAsinअसिनSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत