ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ - टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आज ( ५ नोव्हेंबर) २८ वा वाढदिवस आहे. रणजी सामन्यांपासून आपल्या खेळाची चुणूक दाखवणा-या विराटने कमी वेळात यशाचे शिखर गाठले. त्याचा दिवसेंदिवस बहरत जाणारा खेळ, स्टाईल, कॉन्फिडन्स, लूक्स यासोबतच वैयक्तित आयुष्यातील अनेक घटनांमुळे विराट नेहमीच चर्चेत असतो. सध्याची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या विराटच्या आयुष्यात अनुष्कापूर्वी अनेक मुली येऊन गेल्या. अनुष्कासोबतचे त्याचे नाते कितीही खडतर परिस्थितीतून गेले असले तरी ते दोघे खंबीरपणे एकमेकांसोबत आहेत. पण त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडससोबतचे त्याचे नाते मात्र जास्त काळ टिकले नाही. कोण होत्या त्याच्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंड्स जाणून घेऊया... (विराट-अनुष्का पुन्हा साथ साथ !)(विराट कोहली १६ वर्ष ज्या बँकेचा ग्राहक होता आज त्याच बँकेचा ब्रँड अँबेसेडर)(विराट कोहलीने गायलं ए. आर. रेहमानसाठी गाणं) १) तमन्ना - 'बाहुबाली' चित्रपट फेम तमन्ना ही खरतर साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. तिथे तिचे अनेक चित्रपट गाजले. विराट आणि तमन्नाची पहिली भेट झाली ती एका जाहिरातीदरम्यान. त्यानंतर २०१२ साली त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरवात केली. ब-याच वेळेस ते एकत्र फिरताना दिसले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. आणि त्याला कारण होतं इझाबेल ही युवती. कोण होती ती? 2) इझाबेल लाईट - मूळची ब्राझिलियन अभिनेत्री असलेली इझाबेल राज पुरोहित यांच्या 'सिक्सटीन' या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात आली. या चित्रपटाचे शूटिंग आणि प्रेमोशनच्या निमित्ताने तिने भारतात एक ते दीड वर्षांचा कालावधी घालवला. एका बिझनेसमनच्या पार्टीत इझाबेल आणि विराटची ओळख झाली आणि त्यांचे बंध जुळले. त्यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली आणि त्यामुळे इझाबेल आणि तिच्या पिक्चरलाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी त्यांना सिंगापूरमध्ये एकत्र फिरतानाही पाहिले होते. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये ते एकमेकांपासून दूर झाले. त्यानंतर काही काळातच अनुष्का आणि विराटची ओळख झाली. ३) अनुष्का शर्मा- ' रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून शाहरूखसोबत काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अनुष्का शर्मा ही एक पंजाबी कुडी. सौंदर्यासोबतच अभिनयाचीही देणागी मिळालेली या पंजाबी कुडीने एकपाठोपआठ एक हिट चित्रपट दिले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान विराट आणि अनुष्काची ओळख झाली व अल्पावधीतच ते मित्र बनले. मात्र इतर सेलिब्रिटीजप्रमाणे त्यांनीही आपल्या रिलेशनच्या बातम्या उडवून लावल्या, मात्र त्यांच्याबद्दलची चर्चा वाढतच गेली. खासगी आयुष्यातील मीडियाच्या हस्तक्षेपामुळे विराट भलताच वैतागला होता. त्यानंतर काही काळेन त्या दोघांमध्ये ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. विराटला लग्न करून स्थिर होण्याची इच्छा असताना अनुष्काला मात्र करीअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. सलमान खानच्या ' सुल्तान' चित्रपटाच्या शूटिंगला वेळ देण्यावरून त्या दोघांमध्ये खटके उडायला लागले व या वर्षीया सुरूवातीस ते वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या. सोशल नेटवर्किंग साईट्सवरूनही दोघांनी एकमेकांना अनफलो केल्याने ब्रेकअपच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांचे चाहते निराश झाले. मात्र सुदैवाने ही वाईट फेज लवकरच संपली आणि ते दोघं पुन्हा एकत्र आले. नुकतेच ते गोव्यात एका फूटबॉल सामन्यादरम्यान परत एकत्र दिसल्याने त्यांचे चाहते भलतेच खुश झाले.त्यांची जोडी सदैव अशीच हसत राहू दे अशीच प्रार्थना त्यांचे चाहते करत असतात.भारताच्या या युवा खेळाडूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!