शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 7:35 PM

1 / 10
अभिनेता सलमान खानच्या मैत्रीचे किस्से खूप लोकप्रिय आहेत. सलमानचे अत्यंत जवळचे मित्र आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
2 / 10
या वाईट काळात सलमान खान बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबासोबत उभा असल्याचं दिसलं. घटनेनंतर सलमान खान ताबडतोब रुग्णालयात पोहोचला आणि बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात असतानाही तो उपस्थित होता.
3 / 10
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी एका मुलाखतीत सलमान खानबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, सलमान नेहमीच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे.
4 / 10
झिशान यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर सलमान खान खूप दुःखी होता. सलमान खान बाबा सिद्दिकी यांना आपल्या सख्ख्या भावासारखं मानत होता.
5 / 10
जेव्हा कुटुंबावर वाईट वेळ आली तेव्हा सलमान त्यांच्या पाठिशी उभा राहिला आणि रोज रात्री फोन करून आपलं दुःख शेअर करतो. तसेच त्याला रात्री झोपही लागत नसल्याचं झिशान यांनी म्हटलं आहे.
6 / 10
शिल्पा शेट्टी आणि संजय दत्तसह इतर अनेक स्टार्सही त्यांच्या कुटुंबासाठी आले होते. शिल्पा खूप भावूक झाली होती. हे स्टार्स त्यांना नेहमीच कुटुंबासारखे आहेत असंही सांगितलं.
7 / 10
आपल्या वडिलांच्या सेलिब्रिटी मित्रांबद्दल झिशान म्हणाले की, त्यांच्यासाठी ते फक्त सेलिब्रिटी नाहीत तर खऱ्या कुटुंबासारखे आहेत आणि माझं त्यांच्याशी विशेष नातं आहे.
8 / 10
मुंबईत दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. झिशान यांच्या ऑफिसबाहेरच ही धक्कादायक घटना घडली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका पोस्टद्वारे या हल्लाच्या जबाबदारी घेतली आहे.
9 / 10
याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. सलमान खानलाही लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सातत्याने धमक्या येत होत्या, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा आणखी वाढवली आहे.
10 / 10
याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. सलमान खानलाही लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सातत्याने धमक्या येत होत्या, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा आणखी वाढवली आहे.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीSalman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारी