अर्शद वारसी - २००६ मध्ये बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचे सुत्रसंचालन करण्याचा मान बॉलिवूडचा सर्कीट अर्शद वारसी याला मिळाला होता. त्यावेळी शोचा टीआरपी २.७२ एवढा होता.शिल्पा शेट्टी - २००८ मध्ये बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन बॉलिवूडची हॉट गर्ल शिल्पा शेट्टीने केले. त्यावेळी शोचा टीआरपी २.८९ एवढा होता.अमिताभ बच्चन - २००९ मध्ये बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन करण्याचा मान बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. त्यावेळी शोचा टीआरपी २.८३ येवढा होता.संजय दत्त - २०११ मध्ये बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचे सुत्रसंचालन मुन्नाभाई ने केले होते. त्यावेळी शोचा टीआरपी ४.१९ येवढा होता. सलमान खान आणि संजय दत्त दोघानी मिळून शोचे सुत्रसंचालन केले होते.फराह खान - २०१५ मध्ये सलमान ने आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे बिग बॉसचे ८वे सत्र आर्ध्यावर सोडल्यावर फराह खान खान ने शोचे सुत्रसंचालन केले होते. त्यावेळी ३.२८ एवढा टीआरपी होता.सलमान खान - बॉलिवूडचा दबंग सलमान खानने सर्वात जास्त वेळा बिग बॉसचे सुत्रसंचालन केले आहे. बिग बॉस(डबल - ट्रबल) २०१५ चे सुत्रसंचालन सलमानच करणार आहे. २०१०च्या चौथ्या सत्रात ५.०५ येवढा टीआरपी होता. सहाव्या सातव्या आठव्या पर्वाचे सुत्रसंचालन सलमान खाननेच केले होते.११ ऑक्टोबरला बिग बॉसच्या ९व्या सत्राची सुरवात होणार आहे. डबल - ट्रबल अशी टॅग लाईन वापरुन ह्या सत्राची सुरवात होणार आहे. २००६ - २०१५ च्या दरम्यान सुत्रसंचालन केलेल्या बॉलिवूड कलाकारांचा थोडक्यात घेतलेला आढावा.