शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

एकेकाळी कामाठीपुरातील 'या' गलिच्छ वस्तीत राहत होते कादर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:36 PM

1 / 10
बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता कादर खान यांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आपल्या विनोदबुद्धीच्या कौशल्यावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कलाकाराचं जीवन मात्र प्रचंड हालाखीच्या परिस्थितीत गेलं.
2 / 10
अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, कलाविश्वात ही जागा निर्माण करताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
3 / 10
आज बॉलिवूडच्या इतिहासात कादर खान यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. परंतु, मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला होता. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला होता.
4 / 10
'माझे आई-वडील काबुलमध्ये राहत असताना माझ्या काही भावंडांचं निधन झालं होतं. त्यामुळे काबुलचं वातावरण या मुलांसाठी घातक असल्याचं मत माझ्या आईचं झालं होतं. त्यामुळे माझा जन्म झाल्यावर मी जिवंत रहावा यासाठी आई कित्येक महिने पायी प्रवास करत भारतात आली होती.'
5 / 10
कादर खान यांचे आई-वडील भारतात आल्यानंतर ते मुंबईतील कामाठीपुरामध्ये स्थायिक झाले होते. विशेष म्हणजे कामाठीपुरातील ज्या भागात ते राहत होते. 'तो भाग अत्यंत गलिच्छ आणि भीतीदायक होता', असंही त्यांनी सांगितलं.
6 / 10
कादर खान यांचं संपूर्ण बालपण कामाठीपुरात गेलं. जेथे प्रोस्टिट्यूशन, गुन्हे असं दररोज घडायचं. मात्र, याच परिस्थितीत ते लहानाचे मोठे झाले.
7 / 10
'मुंबईत आल्यावर येथील सगळ्यात गलिच्छ भाग कामाठीपुरातील पहिली गल्ली..आज ज्याला लोक धारावी म्हणतात. ज्या लोकांना कामाठीपुरा माहिती आहे त्यांना त्या जागेतील वास्तव माहित असेल. संपूर्ण जगात जितक्या झोपडपट्टी नसतील तितक्या येथे एका इमारतीत पाहायला मिळतात. तिथे आम्ही तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांमध्ये रहायचो', असं कादर खान म्हणाले होते.
8 / 10
पुढे ते म्हणतात, 'एकीकडे प्रोस्टिट्युशन, दुसरीकडेही प्रोस्टिट्युशन..दारुडे लोक, दिवसाढवळ्या खून सारं काही इथे व्हायचं. जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी इथे घडतात. तिथेच मी लहानाचा मोठा झालो.'
9 / 10
परिस्थितीला गांजून कादर खान यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला सोडलं होतं. त्यामुळे या अशा अवस्थेत कामाठीपुरात राहणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणूनच, एका नातेवाइकाच्या सल्ल्याने त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं.
10 / 10
दरम्यान, याच काळात घरातील परिस्थितीला कंटाळून कादर खान रोज कब्रिस्तानमध्ये जाऊन बसत. यावेळी अभिनेता अशरफ खान त्यांच्या नाटकासाठी एका लहान मुलाचा शोध घेत होते. तेव्हा त्यांच्या दृष्टीस कादर खान पडले आणि येथूनच कादर खान यांचा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला. आणि, त्यानंतर त्यांनी कामाठीपुराला कायमचा रामराम केला.
टॅग्स :Kader Khanकादर खानCelebrityसेलिब्रिटीMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड