डॉ. कोटणीस की अमर कहानी - भारत चीनचे संबंध एरवी कटू असले तरी एका व्यक्तिने त्यांना जोडण्याचे काम केले ती व्यक्ती म्हणजे डॉ. कोटणीस. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका देखील शांताराम यांनीच केली. वसंत देसाई यांचं संगीत या सिनेमाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतात सामाजिक सुधारणांचं पर्व आणणारे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील हा चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन केलंय जब्बार पटेलांनी. मामुटी व सोनाली कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका केलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.संत तुकाराम - सतराव्या शतकातला थोर मराठी संत तुकारामाच्या जीवनावरील हा चित्रपट मराठी माणसाच्या घराघरात पोचला आहे. विष्णूपंत दामले व शेख फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चिक्षपटातील श्रवणीय गाण्यांना संगीत दिलं होतं केशव भोळे यांनी.गांधी - जगभरात कौतुक झालेला महात्मा गांधींवरचा रिचर्ड अॅटनबरोंचा हा चित्रपट. बेन किंग्जलेंनी गांधींची व्यक्तिरेखा साकारली असून या चित्रपटाला अकादमी अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले. आजही पडद्यावरचे गांधी बेन किंग्जलेंच्या रुपातच दिसतात.जोधा अकबर - सोळाव्या शतकातल्या सम्राट अकबरची प्रेमकथा जोधा अकबरमध्ये पडद्यावर आणलीय आशुतोष गोवारीकरने. ऐश्वर्या राय व ह्रतिक रोशनने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.गुरू - गुजरातमधल्या एका लहान गावातला महत्त्वाकांक्षी मुलगा भारतातला अग्रणी उद्योगपती कसा होतो याची ही कथा. हा चित्रपट धीरूभाई अंबानींच्या जीवनावर असल्याचे अलिखित आहे. मणी रत्नमने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायची प्रमुख भूमिका आहे.शहीद - ब्रिटिश सरकारविरोधात सशस्त्र कारवाया करणा-या सरदार भगत सिंगांवर आधारीत हा चित्रपट १९६५मध्ये बनवण्यात आला. याच विषयावर राजकुमार संतोषीने अजय देवगणला घेऊनही चित्रपट बनवला. पहिल्या सिनेमात मनोज कुमार व प्रेम चोप्रा होते.रंग रसिया - राजा रवि वर्मा या १९व्या शतकातील थोर चित्रकाराच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटाचं दिग्दर्शन केतन मेहतांनी केलं असून रणदीप हुडा व नंदना सेन मुख्य भूमिकेत आहेत.सरदार - लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यावर आधारीत या चित्रपटाचे केतन मेहतांनी दिग्दर्शन केले आहे. विजय तेंडुलकर व ह्रदय लानी यांनी पटकथा लिहिली असून परेश रावळ व अन्नू कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.बोस दी फरगॉटन हीरो - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी सुभाषचंद्र बोसांच्या जीवनातील शेवटच्या ज्ञात पाच वर्षांवर आधारीत हा चित्रपट आहे. श्याम बेनेगलांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नेताजींची भूमिका साकारलीय सचिन खेडेकरने.दी डर्टी पिक्चर - दक्षिणेची हॉट अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर दी डर्टी पिक्चर काढला गेला. मिलन लुथ्राने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिल्कची भूमिका विद्या बालनने साकारली. इमारन हाश्मी व नसिरुद्दिन शाहदेखील या चित्रपटात आहेत.भाग मिल्खा भाग - फ्लाइंग सिख अशी ओळख असलेल्या मिल्खा सिंग या धावपटूवर राकेश ओमप्रकाश मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. फरहान अख्तर व सोनम कपूरची भूमिका असलेल्या या चित्रपटाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले.मेरी कोम - जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर पाचवेळा राहिलेल्या व ऑलिंपिकमध्ये कास्यपदक जिंकलेल्या मेरी कोम या बॉक्सरवर गेल्या वर्षी चित्रपट बनवण्यात आला. प्रियांका चोप्रा व दर्शन कुमारने मुख्य भूमिका केलेला हा चित्रपट दिग्दर्शित केला ओमंग कुमारने. सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचे मॅशनल फिल्म अवॉर्ड मेरी कोमला मिळाले.बँडिट क्वीन - सामूहिक बलात्काराला बळी पडलेली फूल्लन देवी हातात शस्त्र घेते आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा बदला घेते. दरोडेखोर झालेली फूलनदेवी नंतर राजकारणात शिरते. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका केलेय सीमा विश्वासने.मांझी दी माउंटन मॅन - पत्नीला वेळेत हॉस्पिटलमध्ये वेळेत नेता न आल्याने मृत्यू झालेल्या दशरथछ मांझीने हॉस्पिटल जवळ आणण्यासाठी ३६० फूट लांब ३० फूट रूंद व २५ फूट उंच डोंगर अक्षरश: हातोडी व चिजेलने खोदला. बिहारमधल्या गयेजवळ घडलेल्या या चरीत्रकथेवर आधारीत मांझी माउंटन मॅन हा नवाजुद्दिन सिद्दीकी व राधिका आपटे यांची भूमिका असलेला केतन मेहतांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने चरीत्रकथेवर आधारीत गाजलेले काही चित्रपट.