त्रिशा कृष्णन: साऊथमधील टॉपची अभिनेत्री असलेली त्रिशा कृष्णन हिचेही ट्विटर अकाऊंट एका अज्ञात व्यक्तीने हॅक केले होते. यासंबंधी त्रिशाने सायबर क्राईम ब्रांचमध्ये तक्रार दाखल केली होती.अली जफर : पाकिस्तानी गायक व अभिनेता अली जफरचे बॉलिवूडमध्येही खूप फॅन्स आहेत. तरूणींचा लाडका अभिनेता असलेल्या अली जफरलाही हॅकिंगचा फटका बसल्याचे समोर आले होते.श्रुती हसन : अभिनेता कमल हासन व सारिका यांची सौंदर्यवती कन्या असलेली अभिनेत्री श्रुती हसनचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. मात्र थोड्याच वेळात ते पूर्ववत झाले. काही वर्षांपूर्वी आपले फेसबूक व जी-मेल अकाऊंटही हॅक करण्यात आले होते असे श्रुतीने म्हटले होते.करण जोहर : दिग्दर्शक करण जोहरही सायबर हॅकिंगचा बळी ठरला होता. त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यातून इतर सेलिब्रिटींना मेसेजेस पाठवण्यात येत होते. करणने स्वत: ट्विट करून ही घटना उघडकीस आणली होती.महेश भट्ट : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी हॅकिंगचा फटका बसला होता. एका अज्ञात व्यक्तीने भट्ट यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करत कमाल. आर. खान पूनम पांडे आणि सनी लिऑन या सेलिब्रिटीजना अश्लील मेसेजेसही पाठवले होते.पूनम पांडे : बोल्ड फोटशूट्स आणि तितकेच बिनधास्त व्यक्तीमत्व असलेली मॉडेल पूनम पांडे हिची poonampandey.in ही वेबसाईट काही पाकिस्तानी युवकांनी हॅक केली होती आणि त्यावर पाकिस्तान झिंदाबाद असा मेसेजही दिसत होता. या घटनेमुळे पूनम अतिशय घाबरली होती व अस्वस्थही झाली होती.बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकिंगचा फटका बसल्याचे नुकतेच उघड झाले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी बिग बींचे @SrBachchan हे ट्विटर अकाऊंट हॅक करून ते काही पॉर्न साईट्स फॉलो करत असल्याचे दाखवले होते. अमिताभ यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमधील इतर काही सेलिब्रिटींनाही हॅकिंगचा जोरदार फटका बसला होता.