Chahatt Khanna Opens About Sukesh Chandrashekhar Marriage Proposal To Her In Tihar Jail
महाठग सुकेशला व्हायचं होतं 'या' अभिनेत्रीच्या मुलांचा बाप; तिहार जेलमध्ये केले प्रपोज By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 2:22 PM1 / 10२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे न्यायालयाने जॅकलीन फर्नांडिसला दिलासा देत तिला परदेशात जाण्याची परवानगी दिली असताना दुसरीकडे सुकेश चंद्रशेखर याने आधीच्या पत्रातून नोराविरोधात गंभीर आरोप केला आहे. 2 / 10नोरावर आरोप करण्यासोबतच सुकेशने निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना या दोघांचीही नावे सांगितली. या दोघांसोबत केवळ व्यावसायिक नाते होते असं सुकेशनं म्हटलं होतं. मात्र, चाहत खन्नाने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात नुकत्याच नोंदवलेल्या तिच्या जबाबात सुकेश आणि तिच्या नात्याचं उलट चित्र उघड केले. 3 / 10यानंतर एका मुलाखतीत अभिनेत्रीने सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात अनेक मोठे खुलासे केले आहेत, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. अलीकडेच चाहत खन्नाने सांगितले की, २०१८ मध्ये मला एका कार्यक्रमात जज म्हणून उपस्थित राहण्याचा फोन आला. मुंबई विमानतळावर, मी एंजल खान नावाच्या एका महिलेला भेटले होते. 4 / 10तिने सांगितले की, ती माझ्यासोबत कार्यक्रमाला येईल. दिल्लीत उतरल्यावर शाळेत जाण्यासाठी गाडी घेतली. पण थोड्या वेळाने आम्ही अचानक थांबलो आणि शाळेच्या आत प्रवेश दिला जाणार नाही म्हणून आम्हाला गाडी बदलावी लागेल असे सांगितले. 5 / 10त्यानंतर आम्ही एका ग्रे रंगाच्या इनोव्हामध्ये बसलो आणि काही सेकंदांनंतर मला समजले की आम्ही तिहार जेलच्या बाहेर आहोत. याबाबत मी त्यांना विचारले असता, तुरुंगातून शाळेत जावे लागते, असे तिने सांगितले.6 / 10यानंतर एक व्यक्ती तिला शेखर रेड्डी म्हणत खोलीत भेटला होता. 'त्याने फॅन्सी शर्ट घातला होता, भरपूर परफ्यूम लावला होता आणि सोन्याची चेन घातली होती. त्याने स्वत:ची ओळख एका लोकप्रिय दक्षिण टीव्ही वाहिनीचे मालक आणि जयललिता यांचा पुतण्या अशी करून दिली. 7 / 10तो म्हणाला की, तो माझा टीव्ही शो 'बडे अच्छे लगते हैं' पाहतो आणि मला भेटू इच्छितो. मी त्याला म्हणालो, 'मला इथे का बोलावलं? मी माझ्या सहा महिन्यांच्या बाळाला घरी सोडले आहे आणि कार्यक्रम आहे असं समजून इथे आले. तेव्हा तो एका गुडघ्यावर बसला आणि म्हणाला की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. 8 / 10मी विवाहित असून दोन मुले आहेत, असे सांगून मी ओरडले. पण त्याने सांगितले की, माझा नवरा माझ्यासाठी योग्य माणूस नाही आणि मला तुझ्या मुलांचा बाप बनायचं. आम्ही दोघांनी २० ते २५ मिनिटे जेलमध्ये घालवले. 9 / 10त्यानंतर तिथून थेट विमानतळावर गेलो आणि वाटेत एंजलने मला सुमारे दोन लाख रुपये दिले आणि सांगितले की सुकेशला तू आवडते असं चाहत खन्नानं म्हटलं. या घटनेनंतर सुकेशने मला दोन ते तीन वेळा फोन केला. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून त्याचे कॉल येत होते. 10 / 10तो कुठल्याही नंबरवर कॉल करू शकतो असं त्याने सांगितले होते. यासोबतच माझ्या पतीचाही यात सहभाग असल्याचा दावा त्याने केला आहे. तो मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा. कॉल सुमारे एक मिनिट चालला आणि तो माझ्या मुलांबद्दल विचारायचा आणि मला काही हवे आहे का ते विचारायचा असं चाहत खन्नाने म्हटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications