शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दीपिका कक्कडने मुस्लीम धर्म स्विकारुन केलं होतं लग्न, नावही बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 1:17 PM

1 / 6
'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सन 2018 साली आजच्यादिवशीच दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
2 / 6
दीपिका आणि शोएबच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. कारण, लग्नापूर्वी दिपिकाने शोएबासाठी इस्लाम धर्म स्विकारला होता. त्यामुळे, लग्नानतंर दिपिकाचे नाव फैजा ठेवण्यात आले होते.
3 / 6
दिपिका हे नाव केवळ घरातच वापरते, मात्र, लग्नानंतर अनेक बाबींचा या जोडप्याला सामना करावा लागलाा होता. दिपिकाने केवळ धर्मच बदलला नव्हता, तर यापूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर हे तिचं दुसरं लग्न होतं.
4 / 6
दिपिकाचं लग्न शोएबच्या मूळगावी म्हणजे युपीतील मौदाहा या गावात झालं होतं. या लग्नासाठी गावातील सर्वच लोकं आले होते. लग्नावेळी तिच्या धर्म परिवर्तनाची बाब लपविण्यात आली होती.
5 / 6
दिपिकाला माध्यमांसमोर या प्रश्नाला सामोरे जावे लागले, त्यानंतर दिपिकाने स्वत:हून होय मी धर्मपरिवर्तन केल्याचं सांगितलं. जे सत्य आहे ते सत्य आहे. मी धर्मपरिवर्तनाच्या बाबतीत जास्त चर्चा करू इच्छित नाही, असेही तिने म्हटले.
6 / 6
दिपिका आणि शोएब सध्या आनंदी जीवन जगत आहेत, दोघांचे रोमँटीक फोटो सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतात. दिपिका आणि शोएब यांची भेट ससुराल सिमर का या मालिकेच्या सेटवर झाली होती.
टॅग्स :bollywoodबॉलिवूडMuslimमुस्लीमmarriageलग्न