लवकरच आलिया हृतिक रोशनसोबत आशिकी-३ चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरूख सोबत दिसणार आहे. अनेक बड्या कलाकारांसोबत मेगा प्रोजेक्ट्समध्ये काम करणा-या आलियासाठी एकूणच हे वर्ष खूप बिझी आणि यशस्वी ठरणार असल्याचे दिसतं.कपूर अँड सन्स हा आलियाचा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होणार असून त्यात ती सिद्धार्थ म्हलोत्रा व पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.पहिल्या चित्रपटात फक्त ग्लॅम डॉल म्हणून मिरवणा-या आलियाने त्यानंतर इम्तियाज अलीच्या हायवे चित्रपटात उत्तम अभिनय करत सर्वांचीच वाहवा मिळवली.करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दि इयर या चित्रपटातून तिने लीड अॅक्ट्रेस म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात तिच्यासोबत वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.अवघी ६ वर्षांची असताना आलियाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रीती झिंटा अक्षय कुमार आणि आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या संघर्ष या चित्रपटात आलियाने प्रीती झिंटाच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.दिग्दर्शक महेश भट्ट व अभिनेत्री सोनी राझदान यांची धाकटी मुलगी असलेल्या आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ साली मुंबईत झाला. तिला शाहिन नावाची मोठी बहीण असून पूजा भट्ट व राहुल भट्ट हे दोघे तिची सावत्र भावंडे आहेत.स्टुडंट ऑफ दि इयर हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया हायवे अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवणारी बबली सेन्शुअस पण स्वीट अभिनेत्री असलेल्या आलिया भट्टचा आज (१५ मार्च) वाढदिवस. त्यानिमित्ताने तिच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी खास वाचकांसाठी..