शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Happy Birthday Genelia Dsouza: ९ वर्षांच्या अफेअरनंतर बांधली 'लग्नगाठ'; जेनेलिया आणि रितेश देशमुखची अशी आहे 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 11:14 AM

1 / 6
रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. दोघांची केमिस्ट्री, एकमेकांसोबतचं असलेलं गोड नातं, हे त्यांच्या सर्वच चाहत्यांना आवडतं. ५ ऑगस्ट म्हणजेच आज जेनेलियाचा वाढदिवस.
2 / 6
जेनेलिया सोशल मीडियावर तशी अतिशय अॅक्टिव्ह असते. परंतु तुम्हाला माहितीये का की वयाच्या १५ व्या वर्षीच जेनेलियानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. बॉलिवूडचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती एका जाहिरातीत झळकली होती.
3 / 6
जाहिरातीनंतर ती प्रकाशझोतातही आली. वयाच्या सोळाव्या वर्षी जेनेलियानं चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. तुझे मेरी कसम या चित्रपटातून तिनं पदार्पण केलं. विशेष म्हणजे रितेश देशमुखचाही हा पहिलाच चित्रपट होता.
4 / 6
दोघांची पहिली भेट एअरपोर्टवर झाली होती. रितेशला भेटण्यापूर्वी जेनेलियाच्या मनात त्याची प्रतीमा निराळीच होती. रितेश राजकीय घराण्यातून येतो. तसंच तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्यामुळे थोडी निराळी भावना तिच्या मनात होती.
5 / 6
रितेशमध्ये थोडा अॅटिट्युड असेल किंवा तो थोडा अहंकारी असेल असं तिला वाटत होतं. परंतु जेव्हा दोघांनी तुझे मेरी कसम या चित्रपटात काम केलं, तेव्हा रितेश बिलकुल असा नाही. तो अतिशय समंजस आणि चांगला आहे हे तिला समजलं. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री इतकी वाढली की त्यांनी डेटिंगला सुरूवात केली. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये ते विवाहबंधनात अडकले.
6 / 6
रितेश आणि जेनेलिया यांच्या वयात जवळपास ९ वर्षांचं अंतर आहे. २०१४ मध्ये त्यांना पुत्ररत्न झालं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव रिआन असं ठेवलं. रितेश जेनेलिया यांना दोन मुलं आहेत. Apostolic Carmel High School मधून जेनेलियानं आपलं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सेंट अँड्र्यू कॉलेमधून डिग्री पूर्ण केली. जेनेलियाला खेळाचीही खुप आवड आहे. ती स्टेट लेव्हल अॅथलिटदेखील होती आणि नॅशनल लेव्हल फुटबॉल प्लेअरदेखील होती.
टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखGenelia DSouzaजेनेलिया डिसूजाbollywoodबॉलिवूड