ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २ - 'बॉलिवूडचा बादशहा' या नावाने प्रसिद्ध असलेला शाहरूख खान याचा आज ५१ वा वाढदिवस. २ नोव्हेंबर १९६५ रोजी नवी दिल्ली येथे शाहरूखचा जन्म झाला. शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी.. - 'किंग ऑफ रोमान्स' नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहरूखचा सेन्स ऑफ ह्युमर उत्कृष्ट आहे. त्याने अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. - शाहरूखने टीव्ही मालिकांमधून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला. 'फौजी' आणि 'सर्कस' या मालिकेतील त्याचे काम खूप गाजले. - तो ' किंग ऑफ रोमान्स' म्हणून प्रसिद्ध असला तरी निगेटीव्ह शेडच्या भूमिकाही शाहरूख तितक्याच ताकदीने साकारतो. ' बाजीगर', 'अंजाम', 'डर', 'डुप्लिकेट', ' डॉन' आणि 'डॉन २' या सहा चित्रपटांमध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारल्या, ज्याचे खूप कौतुकही झाले. (तू असशील शाहरूख, लेकिन मै भी तो हूं..)(शाहरुख खानने करिअरच्या सुरुवातीला केलेली शॉर्ट फिल्म व्हायरल) - सध्या एका चित्रपटासाठी करोडोंचे मानधन घेणा-या शाहरूखची पहिली कमाई होती अवघी ५० रुपये.. - शाहरूखला आत्तापर्यंत एकूण २२२ पुरस्कार मिळाले आहेत. तर १५ वेळा त्याला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यानंतर शाहरूख असा दुसरा अभिनेता आहे ज्याला ८ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. - २००५ साली त्याला 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (शाहरुख-आलिया 'कॉफी विथ करण -5'चे पहिले गेस्ट)(VIDEO : शाहरुख-आलियाच्या 'डिअर जिंदगी'चा टीझर रिलीज) - चित्रपट, जाहिराती, इतर बिझनेस, या सर्वांमधून शाहरूखने प्रचंड कमाई केली असून त्याची संपत्ती सुमारे ४ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समजते. - अभिनयातला बादशहा असलेला शाहरूख सोशल नेटवर्किंग साईट्सवरही तितकाच अॅक्टिव्ह असतो. ट्विटरवर आणि फेसबूकवर त्याचे २ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ४१ लाखांहून अधिक चाहते त्याला फॉलो करतात. त्याला कॉम्प्युटर गेम्स, व्हिडीओ गेम्स आणि हायटेक गॅजेट्स खूप आवडतात. - दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत शाहरुखने ८६ हून अधिक चित्रपटांत काम केले. नुकत्याच आलेल्या करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' या चित्रपटातही त्याने कॅमिओ रोल साकारला. - येत्या काळात शाहरूखचे ' डियर जिंदगी', 'रईस' आणि 'द रिंग' हे बहुचर्चित चित्रपट प्रदर्शत होणार आहेत. यात अनुक्रमे तो आलिय भट्ट, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि अनुष्का शर्मासोबत काम करणार आहे.