मकरंद अनासपुरे : मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्यातील एक अलग अंदाज त्यांची भाषा आणि विनोदशैली यांचे तर मराठी प्रेक्षक चाहते आहेत. आतापर्यंत मकरंद यांनी अनेक वेगवेगळ््या भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी त्यांना विनोदी भूमिकेमध्येच जास्त पसंत केले आहे. परंतु मकरंद अनासपुरे यांनी त्यांची ही इमेज बाजूला सरकावीत पारध या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. मकरंद यांच्या पारधमधील अंबादास या कॅरेक्टरचे प्रेक्षकांकडूनदेखील कौतुक करण्यात आले.भरत जाधव : त्यांच्या चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. मराठीतील अव्वल स्टार अन् सशक्त अभिनेता म्हणून भरत जाधव यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे कॉमिक टायमिंग तर अफलातून आहे. पण फक्त विनोदी चाकोरीत न अडकता आपणही खलनायक पेलू शकतो असे दाखवीत भरत जाधव हे बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामध्ये एकदमच अनोख्या रूपात प्रेक्षकांसमोर आले.जितेंद्र जोशी : म्हेवणे.. म्हेवणे म्हेवण्यांचे पाहुणे... असे म्हणणारा साई आठवतोय का तुम्हाला. दुनियादारी या चित्रपटामध्ये वेगळ्या धाटणीचा खलनायक साकारणारा साईराज म्हणजेच जितेंद्र जोशी त्या भूमिकेमध्ये अक्षरश: भाव खाऊन गेला. नायकाच्या भूमिका पडद्यावर यशस्वीरीत्या पेलणारा जितेंद्र दुनियादारीत थेट खलनायकाच्या भूमिकेतच प्रेक्षकांच्या समोर आला. त्याचा एकंदरीतच लुक हेअरस्टाईल अन् डायलॉगबाजीचा अंदाज पाहता जितेंद्र साईराजच्या भूमिकेत एकदम उठावदार दिसला होता. एवढेच नाही तर पोश्टर गर्ल या सिनेमातदेखील जितेंद्रने निगेटिव्ह शेडची भूमिका साकारली आहे. भारतराव झेंडे ही भूमिका पाहताना त्या कॅरेक्टरचा राग आल्याशिवाय राहत नाही.रितेश देशमुख - कॉमेडीमध्ये जम बसवलेल्या रितेशने एक व्हिलन मधून खलनायक रंगतव सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.हृतिक रोशन : बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेल्या हृतिक धूम २ मध्ये निगेटीव्ह भूमिका साकारली होती.अक्षय कुमार : खिलाडीकुमार अक्षय कुमार त्याच्या स्टंट्ससाठी प्रसिद्ध... पण अजनबी चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारली.नाना पाटेकर : नटसम्राटसारखी भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील खलनायकाच्या भूमिका जबरदस्त रंगविल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे नटसम्राट पक पक पकाक या चित्रपटातील नानांच्या भूमिका पाहिल्या तर कोणालाच विश्वास बसणार नाही हा कलाकार पडद्यावर खतरनाक व्हिलनची भूमिका साकारू शकेल. परंतु नानांनी हिंदी चित्रपट अन् मराठीमध्येदेखील खलनायकाचा रोल केला आहे. १९८६ साली प्रदर्शित झालेला माफीचा साक्षीदार हा चित्रपट पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून प्रकरणावर आधारित होता. या चित्रपटामध्ये नानांनी साकारलेली भूमिका खरंच प्रेक्षक विसरू शकणार नाहीत एवढ्या ताकदीची होती. तर अग्निसाक्षी या हिंदी सिनेमामध्ये नानांनी साकारलेला विश्वनाथ पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.अमिताभ बच्चन : चित्रपटसृष्टीचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनाही खलनायकाच्या भूमिका साकारण्याचा मोह आवरला नाही. सत्ते पे सत्ता अक्स आंखे आग (शोलेचा रिमेक) या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या.शाहरूख खान : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख हा त्याच्या रोमँटिक अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. परफेक्ट लव्हर बॉय अशा भूमिका साकारणा-या शाहरूखने कारकिर्दीच्या सुरूवातील बाजीगर डर अंजाम अशा अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी वा निगेटीव्ह शेडच्या भूमिका साकारल्या होत्या. आणि आता दोन दशकांनी आलेल्या फॅन चित्रपटातही त्याने अशीच निगेटीव्ह भूमिका रंगवली आहे.चित्रपटात हिरोसोबत दोन हात करीत लढणाऱ्या खलनायकांच्या सिन्सवर थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या पडल्याशिवाय राहत नाही. गब्बर.. मोगॅम्बो.. यांच्या भूमिका तर चित्रपटाच्या इतिहासात जमा आहेत. चित्रपटात जोपर्यंत एखादा तगडा खलनायक नाही तोपर्यंत त्या चित्रपटात जान नाही असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. त्यामुळेच अनेक नायकांनाही खलनायक साकारण्याची भुरळ पडली.