शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 4:36 PM

1 / 9
बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. सध्या उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात राज्य महिला आयोगात तक्रार केली आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
2 / 9
उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते, ती तिच्या स्पष्ट वक्तृत्वामुळे देखील चर्चेत असते.
3 / 9
उर्फी कधी ती तिच्या वक्तव्यामुळे तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलिंगची शिकार बनते. असेच एक विधान उर्फी जावेदने काही दिवसापूर्वी दिले होते.
4 / 9
उर्फी जावेदने लग्नाबाबत एक विधान केले आहे. या विधानावर सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाली. 'मी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही, असं वक्तव्य उर्फी जावेदने केले होते.
5 / 9
उर्फी जावेदने काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले होते.
6 / 9
'मी मुस्लिम आहे आणि जेव्हा कोणी सोशल मीडियावर घाणेरडे कमेंट करते तेव्हा बहुतेकजण मुस्लिम असतात. ते माझा तिरस्कार करतात, कारण त्यांना वाटते मुस्लिम महिलांनी विशिष्ट पद्धतीने वागावे.'त्यांना समाजातील सर्व महिलांवर नियंत्रण ठेवायचे आहे. या कारणामुळे त्या मुलांवर विश्वास ठेवत नाही, असंही उर्फी जावेद म्हणाली.
7 / 9
या मुलाखतीत उर्फी जावेदला लग्ना संदर्भातही प्रश्न विचारले. यावरही तिने प्रतिक्रिया दिल्या.
8 / 9
'आपल्या समाजाबाहेरील मुलाशी लग्न करणार का असा प्रश्व विचारण्यात आला. यावेळी उर्फी म्हणाली, 'मी कोणत्याही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही.
9 / 9
मी इस्लामला मानते पण कोणताही धर्म मानत नाही. मी कोणावर प्रेम करते याची मला पर्वा नाही. मी ज्याच्याशी हवं त्याच्याशी लग्न करू शकते, असंही उर्फी म्हणाली.
टॅग्स :Urfi Javedउर्फी जावेदbollywoodबॉलिवूड