शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५० व्या वर्षीही Mandira Bedi फिट कशी?, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 5:58 PM

1 / 5
डीडी नॅशनलवरची शांती सीरिअल असो किंवा आयपीएल अनेक ठिकाणी अभिनेत्री मंदिरा बेदीला पाहिलं असेल. ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच फिटनेस आयकनही आहे. वयाच्या ५० व्या वर्षीही तिचा फिटनेस एका कॉलेजच्या तरूणीप्रमाणे आहे.
2 / 5
रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये भाग घेतल्यानंतर वर्कआऊटचा विचार तिच्या डोक्यात आला. २०२१ मध्ये तिच्या पतीचं निधन झालं. परंतु त्यानंतरही तिनं न डगमगता आपल्या कुटुंबालाही सांभाळलं आणि आपल्या फिटनेसवरही लक्ष दिलं.
3 / 5
तिनं आपल्या फिटनेसनं सर्वांनाच इंप्रेस केलं आहे. ती कायमच सोशल मीडियावर योग आणि व्यायाम करतानाचे आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आठवड्यातून पाच दिवस ती वर्कआऊट करते. याशिवाय ती जिम, स्विमिंग आणि रनिंगही करते. आपल्या या रुटीनबाबत तिनं असा काही नियम घालून घेतलाय की प्रवासादरम्यानही ती व्यायाम सोडत नाही.
4 / 5
प्रवासादरम्यान जेव्हा व्यायामाची इक्विपमेंट्स नसतात तेव्हा मंदिरा आपल्या रूममध्ये व्यायाम करते. तिला धावणंही आवडतं. तिनं आतापर्यंत दोन हाफ मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता. ती एका दिवसात 1000 स्वाट्सही करते.
5 / 5
व्यायामाशिवाय डाएट बद्दल सांगायचं झालं तर तिला साधं जेवण आवडतं. वर्कआऊटपूर्वी ती एक केळं खाते आणि लंचमध्ये भाजी, डाळ आणि चपाती घेते. ती लाईट डिनर घेते आणि त्यात ती चपाती घेत नाही. ज्यांना आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला आवडतं त्यांनी मंदिराला फॉलो केलं पाहिजे.
टॅग्स :Mandira Bediमंदिरा बेदीbollywoodबॉलिवूडTelevisionटेलिव्हिजन