Kiran Rao Birthday: Aamir had to pay 50 crores to marry Kiran
इतकं सोप्प नव्हतं राव! किरणसोबत लग्न करण्यासाठी आमिरला मोजावे लागले होते तब्बल 50 कोटी!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 2:16 PM1 / 8किरण राव आता आमिर खानची पत्नी राहिलेली नाही. काहीच महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला.2 / 8किरण राव तशी गुणी दिग्दर्शिका आणि लेखिका. पण आमिर खान आयुष्यात आला आणि आमिरची पत्नी हीच तिची जणू ओळख बनली होती.3 / 8‘लगान’च्या सेटवर किरण आमिर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 मध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली.4 / 8 लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर आमिर व किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.5 / 8पण हे खरं आहे. होय, कारण किरणच्या प्रेमात पडला तेव्हा आमिर विवाहित होता. रिना दत्त त्याची पत्नी होती. रिनाला घटस्फोट दिल्याशिवाय किरणशी लग्न करणं शक्य नव्हतं.6 / 8 रिनाला घटस्फोट देण्यासाठी आमिरला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते. आमिरने पोटगी म्हणून रिनाला 50 कोटी रुपये दिले होते. 7 / 8रिनाला घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षांनंतर आमिर आणि किरणने लग्न केले होते. 8 / 8 करिअरच्या सुरुवातील किरण रावने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications