शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमाईच्या बाबतीत 'मालेगावचा छोटू दादा' पडतोय अनेकांवर भारी; एका व्हिडीओसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 4:46 PM

1 / 9
व्यक्तीच्या रंग, रुप, उंची यावर त्याचं कर्तृत्व अवलंबून नसतं तर, त्याच्यात असलेली जिद्द आणि टॅलेंटवर ते ठरत असतं असं कायम म्हटलं जातं. असंच काहीसं मालेगावच्या छोटू दादाच्या बाबतीत घडल्याचं दिसून येतं. युट्यूबवर कॉमेडी व्हिडीओंचे ब्लॉग करुन हा छोटू दादा आज लोकप्रिय विनोदवीरांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे.
2 / 9
प्रसिद्ध युट्यूबर छोटू दादा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कॉमेडिअनचं खरं नाव शफीक असं आहे. परंतु, कमी उंची असल्यामुळे त्याने त्याच्या युट्यूब चॅनेललाही 'छोटू दादा' हेच नाव दिलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखोंच्या संख्येने लाइक्स येत असतात.
3 / 9
शफीक छोटू याचा जन्म २५ नोव्हेंबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे झाला. शफीकची उंची केवळ 4.1 फूट आहे.
4 / 9
कमी उंचीमुळे गावातील सगळेजण त्याची चेष्टा करायचे. परंतु, या ट्रोलिंगमधूनच काहीतरी नवं करण्याची कल्पना त्याला सुचली. आणि,गावातील वसीम या व्यक्तीजवळ त्याने युट्यूब व्हिडीओ करण्याची इच्छा व्यक्त केली.
5 / 9
2017 मध्ये, शफीक छोटूला पहिल्यांदा वसीमच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या व्हिडिओमध्ये त्याने 'छोटू हल्क'ची भूमिका साकारली होती.
6 / 9
आज, यूट्यूबवर छोटू दादाची लोकप्रियता प्रचंड वाढली असून तो अनेक दिग्गज सेलिब्रिटींना लोकप्रियतेमध्ये टक्कर देत आहे.
7 / 9
विशेष म्हणजे छोटू दादा एका व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी 1.25 लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येत.
8 / 9
कमाईच्या बाबतीत अनेका कलाकारांना टक्कर देणाऱ्या छोटू दादाचं YouTube वर खान्देशी मुव्हीज नावाचे चॅनलदेखील असून त्याचे 29.7M सबस्क्रायबर्स असल्याचं सांगण्यात येतं.
9 / 9
यूट्यूबचा राजपाल यादव म्हणून छोटू दादाची एक वेगळी ओळखही आहेय
टॅग्स :Celebrityसेलिब्रिटीTV Celebritiesटिव्ही कलाकारYouTubeयु ट्यूबTelevisionटेलिव्हिजन