शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Romina Pourmokhtari, Sweden Climate Minister: २६ वर्षांची तरूणी बनली स्वीडनची मंत्री! जाणून घ्या कोण आहेत रोमिना पोरमोख्तारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 8:43 PM

1 / 9
Romina Pourmokhtari, Sweden Climate Minister: राजकारण हा केवळ अनुभवी आणि वयाशी चाळीशी उलटलेल्यांचा पिंड आहे असे गणित हल्ली कमी पाहायला मिळते. आजकाल तरूण पिढीतील अनेक युवक-युवती राजकारणात सक्रीय असल्याचे दिसतात. राजकारणात युवा पिढी रस घेताना दिसतेय ही दिलासा देणारी गोष्ट आहे. स्वीडन या देशालाही रोमिना पोरमोख्तारी यांच्या रूपाने असाच एक अतिशय तरूण मंत्री राज्यकारभार करण्यासाठी मिळालेला आहे.
2 / 9
स्वीडनच्या नवीन सरकारने नुकतेच २६ वर्षीय रोमिना पोरमोख्तारी यांच्याकडे हवामान खात्याचा कारभार सोपवला. गेल्या काही वर्षांत हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग याबाबत अनेक देश चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच रोमिना यांना हे खाते मिळाले असून त्यांना देशातील सर्वात तरुण मंत्री होण्याचा मान मिळाला आहे.
3 / 9
युवा हवामान विषयक सामाजिक कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांची ओळख संबंध जगाला हळूहळू होतच आहेत. त्या स्वीडनमध्येच स्थायिक आहेत. त्यांच्या देशातील हवामान खात्याचा कार्यभार सांभाळण्याचे शिवधनुष्य रोमिना पोरमोख्तारी यांना पेलायचे असणार आहे.
4 / 9
नवनिर्वाचित पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी स्वीडनच्या कॅबिनेट सदस्यांमध्ये हवामान मंत्री म्हणून रोमिना यांची नियुक्ती केली. त्यानंतर २६ वर्षांच्या या तरूण महिला मंत्र्यासह स्वीडनमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी उजव्या पक्षाचा आणि स्वीडिश डेमोक्रॅटचा पाठिंबा देखील मिळाला.
5 / 9
स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात जन्मलेल्या रोमिना पोरमोख्तारी यांना हवामान आणि पर्यावरण विभाग मिळाला आहे. त्या सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. याआधी स्वीडनमध्ये सर्वात तरूण मंत्री होण्याचा रेकॉर्ड २७ वर्षांपूर्वी झाला होता. तो रेकॉर्ड रोमिना यांनी मोडीत काढला.
6 / 9
रोमिना लिबरल पार्टीच्या युथ विंग प्रमुख होत्या. त्या आतापर्यंत लिबरल पार्टीच्या युथ विंग प्रमुखपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत होत्या. पण रोमिना यांना राजकीय विश्वात हवामानासंदर्भातील गोष्टींसाठी फारशी ओळख नसल्याने पंतप्रधान क्रिस्टर्सनच्या या निर्णयावर जोरदार टीका केली जात असल्याचे दिसतोय.
7 / 9
२०२० मध्ये, त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 'स्वीडन डेमोक्रॅट्स'ला विरोध दर्शवला होता, पण उल्फ क्रिस्टरसन यांना पाठिंबा दिला होता.
8 / 9
स्वीडन हे तरूण हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गचे घर आहे. त्यांनी लाखो तरुणांसह एक विशाल जागतिक चळवळ सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांच्यामुळेच हवामान बदलाच्या धोक्यांवर वादविवादाचा एक नवीन प्रवाह निर्माण झाला आहे.
9 / 9
त्यातच स्वीडनमध्ये हवामान बदलाच्या अभ्यासाशी फारसा संबंध नसलेल्या रोमिना यांना पद देण्यात आल्याने आता त्या कशा पद्धतीने कार्यभार सांभाळतील आणि काय नवे व क्रांतिकारी निर्णय घेतली याकडे संपूर्ण स्वीडनचे आणि अनेक देशातील तरूण राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
टॅग्स :ministerमंत्रीPoliticsराजकारणGreta Thunbergग्रेटा थनबर्गViral Photosव्हायरल फोटोज्