Oscar: Indigenous looks on the red carpet; Appreciation for preserving sari culture abroad
Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 4:15 PM1 / 10रेड कार्पेटवरील ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात यंदा भारताचा झेंडा रोवला गेला. भारतीय सिनेसृष्टीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यानंतर आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. 2 / 10यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR ला ऑस्करच्या शर्यतीत सामील होता. त्यामुळे, आरआरआरची स्टारकास्टही सोहळ्याला उपस्थित होती. 3 / 10 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही प्रेजेंटर म्हणून या पुरस्कार सोहळ्यात दिसून आली. दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता.4 / 10आरआरआर टीम संपूर्ण भारतीय पोशाषात दिसून आली. विशेष म्हणजे आरआरआरच्या कलाकारांमधील महिला वर्गाने भारतीय साडीचा पेहराव केला होता. 5 / 10अभिनेता रामचरण, दिग्दर्शक राजामौली, एनटीआर ज्युनियर यांच्यासह इतरही भारतीय कलाकारांचा पोषाख सुट बूटातील दिसून आला. त्यामुळेच, भारतीय संस्कृती आणि पेहराव जपल्याचा आनंदही अनेकांना झाला. 6 / 10यंदा आरआरआरसह द एलिफंट व्हिस्पर्स या डॉक्युमेंटरी चित्रपटालाही यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची दिग्दर्शिका गुनीत मोंगा ह्याही सोहळ्याला उपस्थित होत्या. 7 / 10 गुनीत मोंगा यांनीही साडी परिधान करुनच ऑस्करची ट्रॉफी उंचावली, त्यामुळे चाहत्यांना अत्यानंद झाला. एकूणच भारतीय महिला कलारांनी साडीची संस्कृती रेड कार्पेटवर झळकावल्याचेही दिसून आले. 8 / 10कुठल्याही भारतीय प्रोडक्शन हाऊसला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर अवॉर्ड आहे, त्यामुळेच आजची रात्र ऐतिहास आहे, असे गुनीत मोंगा यांनी ऑस्कर विजयाचा फोटो शेअर करत म्हटले.9 / 10ऑस्कर सोहळ्यात रामचरणची पत्नी उपासना हिनेही पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यामुळे, चाहत्यांना ह्या बाबी निदर्शनास येताच त्यांनी सोशल मीडियातून कौतुक केले. 10 / 10 दरम्यान, प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने मोठी कामगिरी केल्याने सर्वांचे लक्ष या पुरस्काराकडे वेधले गेले. सोन्याचा मुलामा असलेल्या ट्रॉफीसह अनेक वस्तू यावेळी विजेत्यांना दिल्या जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications